या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९१ वेदकालनिर्णय. व कित्येक गोष्टीही रचल्या गेल्या होत्या. या काळाच्या उत्तर आगांत ग्रीक व भारतीय आर्य हे एकमेकांपासून विभक्त झाले; व ह्मणूनच त्यांच्यांत व ऋग्वेदांतही कृत्तिकाकालाविषयी काही प्रमाणे मिळत नाहीत. हा काल विशेषेकरून सूक्तरचनेचा होता. तिसरा ह्मणजे कृत्तिकाकाळ. याच्या मयांदा इ. स. पूर्वी २५०० पासून १४०० पर्यंत, ह्मणजे कृत्तिकांत वसंतसंपात होता तेव्हां पासून वेदांगज्योतिषकालापर्यंत. तैत्तिरीयसंहिता व कित्येक ब्राह्मणे यांचा हा काळ आहे. या वेळी ऋग्वेदसंहिता पुरातन झाली होती; व तिचा अर्थही बरोबर समजत नाहींसा झाला होता. ऋक्सूक्ते व त्यांतील गोष्टी यांच्या खऱ्या अर्थासंबंधाने या काळच्या ब्रह्मवाचांत मनमुराद तर्क चालत. नभुचीच्या मरणासंबंधानें इन्द्र व नमुची यांच्यांत ठरलेली अट हे एक अशाच तर्काचे उदाहरण होय. याच काळामध्यें संहितांनां व्यवस्थित स्वरूप प्राप्त झाले आणि अति प्राचीन सूक्तं व यज्ञवाक्ये याचा अर्थ ठरविण्याचा प्रयत्न झाला. याच कालांत भारतीय लोक व चिनीलोक यांचे दळणवळण सुरु होऊन चिनीलोकांनी भारतीयांपासून त्यांची नक्षत्रपद्धति उचलली. प्राचीन संस्कृत वाङ्मयाचा चवथा काळ ह्मणजे इ. स. पूर्वी १४०० पासून ५०० पर्यंत. यालाच बुद्धपूर्वकाळ ह्मणतात. सूत्रं व षड्दर्शनें याच काळांत निर्माण झाली. आतां हे जे काळ दिले आहेत ते अगदी नक्की तसेच आहेत असे समजता कामा नयः जसे जसें मागे जावे तसे तसे शें दोनशे