या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९२ वेदकालनिर्णय. वर्षे झणजे कांहींच नाही असे होते. तरी स्थूल मानाने ते बरोबरच आहेत. या सर्वात जुना जो अदितिकाळ त्या वेळी पंचांगाची अवश्यकता उत्पन्न झाली होती; व यावरून हाच काळ आर्यसुधारणेचा आरंभ नसून ती यापूर्वी किती तरी काळ सुरु झाली असली पाहिजे, हे उघड होते. दुसरा जो मृगशीर्षकाळ तो इ. स. पूर्वी ४००० पासून २६०० पर्यन्त येतो. या वेळी पारशी, ग्रीक आणि भारतीय आर्य हे एकत्र रहात असत व ह्मणून हे तीन लोक वेगळे होण्यापूर्वीही कांहीं वेदाचा भाग तयार झाला होता असे साहजिक अनुमान होतं. या अनुमानाला तुलनात्मक व्युत्पत्तिशास्त्रावरून चांगला आधारही मिळतो. पुराणकथांतील सुमारे साठ नांवें ग्रीक व संस्कृत भाषांत सारखीच आहेत असें मॅक्समुल्लरने दाखविले आहे. इतकी नांवें जर दोघांना समान आहेत, तर त्या नांवांच्या देवांची कृत्ये वर्णन करणारी सूक्तं त्या काळी नसावी असें संभवत नाही. हे तीन लोक विभक्त होण्यापूर्वी कविताही उत्पन्न होऊ लागली होती हे श्लोकचरणवाचक संस्कृत पद, अवेस्तिक पध व ग्रीक पौल या शब्दांवरून उघड होईल. _ अयनचलनामुळे वर्षारंभ दोनदां बदलला गेला असें जर आहे, तर त्या वर्षारंभांच्या मधल्या स्थितीविषयी, तसेच ऋतुकालामध्ये झालेल्या बदलाविषयी कोठें कांहीं उल्लेख आढळत नाहीत हे कसे ? व वैदिक लोकांनां अयनगति त्या वेळी समजली नाही कशी? असे प्रश्न कोणी विचारील. पण त्यांचे समाधान करणे फारसें कठीण नाही. संपातगति समजण्यास गणितादि शास्त्रांचीही थोडीशी