या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. प्रगति झाली पाहिजे व शेकडो वर्षे वेध घेत असले पाहिजे. या अडचणी लक्षात आणल्यास भारतीयांनां अयनगति इतर सर्व राष्ट्रांच्या अगोदर व बरीच सूक्ष्मपणे समजली होती असे आढळेल. हिपार्कस या ग्रीक ज्योतिष्याने ती दर वर्षास कमीत कमी ३६ विकला मानिली आहे. पण सध्या खरोखर ती ५०१ विकला आहे. भारतीय ज्योतिष्यांच्या मते ती ५४ विकला आहे. अर्थात् ती ग्रीक लोकांपासून घेतलेली नव्हे हे उघड आहे. ती त्यांनी स्वतःच आपल्या पद्धतीने काढली असली पाहिजे. - आतां मृगापासून कृत्तिकांपर्यन्त व तेथपासून पुनः अश्विनीपर्यन्त वसंतसंपात येईपर्यन्तच्या मधल्या स्थितीविषयी काही पत्ता लागतो का पाहूं. संवत्सरदेवता जो प्रजापति त्याची जागा मृगपुंजांत. पण तो आपल्या कन्येचाच ह्मणजे रोहिणीचा अभिलाष करून मागे मागे येऊ लागला. हे त्याचे कृत्य अकृत झाले. ह्मणून रुद्राने त्याला मारून टाकिले. यावरून वसंतसंपाताच्या वेळी सूर्य मृगांत नसून हळू हळू रोहिणीकडे येऊ लागला हे उघड आहे. याच्या पुढली स्थिति झणजे वसंतसंपात कृत्तिकांत आला ती. या वेळी ऋतु बरोबर एक महिना मागे आल्यामुळे त्या लोकांनी वर्षारंभ फाल्गुनांतून माघांत आणला व नक्षत्रांचा क्रम मृगाच्या ऐवजा कृत्तिकांपासून सुरू केला. - यानंतरची स्थिति वेदांगज्योतिषांत वर्णिली आहे. त्या वेळी ऋतु आणखी एक पंध्रवडा मागे हटले होते; व वसंतसंपात भरणींशी