या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उत्तरयोः [ फल्गुन्योः ] आदधीत ॥ एषा वै प्रथमा रात्रिः संवत्सरस्य । यदुत्तरे फल्गुनी । मुखत एव संवत्सरस्याग्निमाधाय । वसीयान् भवति" [तै. ब्रा. १-१-२] या तैत्तिरीय ब्राह्मणांतील वाक्यामध्ये पूर्वाफल्गुनी संवत्सराची शेवटची रात्र व उत्तराफल्गुनी ही पहिली रात्र असें मटले आहे. यावर दीक्षित म्हणतातो, “वेदकालीं महिने चांद्र होते; तेव्हां वर्षारंभ चांद्रमासाच्या आरंभी होत असे हे उघड आहे. तेव्हां वरील वाक्यांतील पूर्वाफल्गुनी हे चांद्रमासाचे शेवटचे नक्षत्र आणि उत्तराफल्गुनी हैं पुढील मासाचे आरंभींचे नक्षत्र आहे हे उघड आहे." हे मास पूर्णिमान्त होते असें दीक्षितांचे मत आहेच. आतां पूर्णिमेला चंद्र उत्तराफल्गुनीवर असतांनां जर वर्षारंभ होतो तर हा वर्षारंभ कोणत्या प्रकारचा असला पाहिजे ? सूर्य त्या वेळी उत्तराभाद्रपदांजवळ असणार. व जर हा वर्षारंभ वसंतारंभीचा असेल तर वसंतसंपात उत्तराभाद्रपदांत आला; म्हणजे जवळ जवळ आजची स्थिति किंवा सुमारे २१००० वर्षांमागची स्थिति आली. पण तै. ब्रा. काल इतका जुना आहे असें दीक्षितांस कधीही कबूल असणार नाही. अर्थात् हा वर्षारंभ वसंतारंभींचा नव्हे; उदगयनाबरोबरचाच असला पाहिजे. आतां तैत्तिरीय संहितेतील संवत्सर सत्रांत दिलेल्या तीन वर्षारंभाच्या विचारावरून, फल्गुनीपर्णमासी होणारा वर्षारंभ त्या वेळी चालू नसून त्याच्या + भा. ज्यो. पा. १३३.