या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. होऊन उत्तरायण धनिष्टांच्या आरंभी आलं होतं. याच्या पुढची स्थिति ह्मणजे अश्विनींत वसंतसंपात आला तेव्हांची. या वेळी ऋतु वेदांगज्योतिषापेक्षाही एक पंध्रवडा मागे आले होते. ह्मणून अशा प्रकारचा योग्य तो फेरफार पंचांगासंबंधाने घडवून आणण्याचा प्रयत्न विश्वामित्राने केला. महाभारतांत आदिपर्वामध्ये विश्वामित्राने प्रतिसृष्टि निर्माण करण्याचा व नक्षत्रमाला धनिष्ठांच्या ऐवजी श्रवणापासून सुरू करण्याचा प्रयत्न केला असें वर्णन आहे. इतर पुराणांतही ही गोष्ट दिली आहे व त्यांत विश्वामित्राने एक नवीन आकाश उत्पन्न करण्याचा विचार केला असें वर्णिले आहे. त्याचा अर्थ इतकाच की, विश्वामित्राने पंचांगाची नवीन परिस्थितीप्रमाणे सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, पण तो सिद्धीस न जातां पूर्वीची ह्मणजे कृत्तिकांपासून नक्षत्रांस आरंभ करण्याचीच पद्धत कायम राहिली. पण शेवटी काही दिवसांनी आणखी फेरफार होऊन नक्षत्रांस अश्विनीपासून आरंभ करण्याची पद्धत सुरु झाली. - याप्रमाणे संपातचलनाविषयी क्रमाने एकसारखे उल्लेख आपल्या वाङ्मयामध्ये सांपडत असल्यामुळे वेदांच्या प्राचीनत्वाविषयी काहीं तरी तर्क करीत बसणे आतां रास्त होणार नाही. फल्गुनीपूर्णमासी ज्या काळांत वर्षारंभ होत असे त्या काळाची स्मृति भाद्रपदांतील पितृपक्षावरून आपल्याला होते, या विषयी मागे विवेचन आलेच +चकाराभ्यं च वै लोकं क्रुद्धो नक्षत्रसंपदा । प्रतिश्रवणपूर्वाणि नक्षत्राणि चकार सः ॥ आदिपर्व, ७१-३४.