या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेद कालनिणय. आहे. पूर्वी आपला श्रावणीचा विधि भाद्रपदांत होत असे असें मनुस्मृतीवरून* दिसते. तेव्हां पावसाळाही याच महिन्यापासून सुरु होत असे. कारण श्रावणीचा विधि वर्षाकालाच्या आरंभी झाला पाहिजे असे आश्वलायन गृह्यसूत्रांवरून दिसते [ आ. गृ. सू. ३-५-२.]. पण पुढे तो श्रावणांत होऊ लागला. कारण संपातचलनामुळे पावसाळा एक महिना मागे हटला. तो तसाच आणखी हटत आतां तर ज्येष्टापर्यंत आला आहे. या गोष्टीवरून पहातां ऋतूंच्या कालांत झालेल्या फेरफारांच्याही खुणा आपल्या वाङ्मयांत कांही अंशी सांपडतात, असें ह्मणावयास हरकत नाही. तरी पण या पुराव्याला, वर्षारंभांत झालेल्या फेरबदलांच्या पुराव्या इतकें महत्व देता येत नाही. कारण ऋतु हे स्थानपरत्वे भिन्न भिन्न काळीही होत असतात. असो. आतां इतकेंच पहावयाचे उरलें कीं, इतक्या प्रमाणावरून ठरविलेला वेदकाल प्राचीन व अर्वाचीन विद्वानांच्या मतांशी अविरुद्ध + आहे की नाही? जर्मन पंडित वेबर याने भूगोलविषयक व ऐतिहासिक पुराव्यावरून असे अनुमान काढले आहे की, भारतीय वाङ्म--

  • (अ० ४; ९५ ) श्रावणीच्या विधीचे दोन भाग जे उपाकर्म व उत्सर्जन त्यांचे दोन काल विकल्पेंकरून, मनुस्मृतीत दिले आहेत. ते असे" श्रावण्यां प्रौष्ठपद्यां वाप्युपाकृत्य यथाविधि । युक्तश्छंदास्यधीयीत मासाविप्रोऽर्धपंचमान् ॥ पुष्ये तु छंदसां कुर्याद्वहिरुत्सर्जनं द्विजः । माघशुक्लस्य वा प्राप्ते पूर्वाह्ने प्रथमेऽहनि ॥” प्रौष्ठपदी ह्मणजे भाद्रपदी पौर्णिमा. हा कालाचा विकल्प शाखानुरोधाने आहे असें टीकाकार लिहितात.