या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. याचा आरंभ पारशी व भारतीय लोक ज्या काळी एकत्र होते त्या काळापर्यंत पोचवितां येईल. झेन्द अवेस्ता या पारशी लोकांच्या धर्मग्रंथामध्ये असे काही भाग आहेत की त्यांना वैदिक सूक्तांची रूपांतरें मानतां येईल. यावरून वेबरच्या वरील ह्मणण्याला चांगली पुष्टी येते. डॉ० हौ याच्या मताप्रमाणे वेबर, ह्मणणे खरे ठरावयास वेदग्रंथांचा काल इ. स. पूर्वी २४०० वर्षे मानला ह्मणजे पुरे आहे. परंतु पारशी लोक व ब्राह्मण लोक जेव्हां एकत्र रहात होते त्या काळी वसंतसंपात मृगशीर्षांत होता असे दाखवितां येते, ही गोष्ट हौला माहीत नव्हती. पण आतां ती माहीत झाल्यावर वेदकाल इ. स. पूर्वी ४००० वर्षांइतका मागे नेल्यास कोणतीही सयुक्तिक अडचण येत नाही. आतां पारशीधर्मसंस्थापक जो झोरोआस्तर तो यूरोपांतील ट्रोजन युद्धाच्या (इ. स. पूर्वी १८०० वर्षे ) पूर्वी सुमारे ६०० वर्षांच्या सुमारास होऊन गेला असें लिडिया देशच्या झंथस नांवाच्या ग्रंथकाराचे मत आहे. हा ग्रंथकार इ. स. पूर्वी ४७० वर्षीच्या सुमाराचा आहे. आपल्या हिशोबाप्रमाणे पहातां पारशी व हिंदी लोक हे मृगशीर्षकालाच्या द्वितीयाधीत (इ. स. पूर्वी ३००० ते २५०० वर्षे ) एकमेकांपासून दूर झाले. आतां ही गोष्ट डॉ. हौ आदि मंडळीच्या मताप्रमाणे याहून बऱ्याच अर्वाचीन काली घडली असें जर मानिले तर इ. स. पूर्वी ५ व्या शतकांतील ग्रंथकाराने तिला अगदी नुकतीच झालेली असें झटले असते. परंतु वर लिहिल्याप्रमाणे अँथस हा तसें ह्मणत नाही, ह्मणजे या वरून पारशी व हिंदी