या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. लोक हे जेव्हां एकमेकांपासून विलग्न झाले तो काल इ. स. पूर्वी ने २५०० वर्षांच्या पलीकडचा असला पाहिजे. आतां ग्रीक तत्ववेत्ता आरिस्तातल (इ. स. पूर्वी ३२० वर्षे ) हा तर याच्याही पलीकडे जाऊन म्हणतो की झोरोआस्टर हा प्लेटोच्या पूर्वी ५००० किंवा ६००० वर्षे होऊन गेला. आता हा आंकडा जरी अगदी निश्चित असा मानिला नाही, तरी त्यावरून आरिस्तातलच्या वेळी, झोरोआस्तर हा फार प्राचीन काळी होऊन गेला अशी समजूत होती, एवढे उघड दिसते. आतां झोरोआस्तर जर इतका प्राचीन असेल तर उघडच वेद त्याच्याहूनही प्राचीन असले पाहिजेत. दुसरी एक विचार करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ग्रीस देशामध्ये होमर कवीने इलियड हे काव्य इ. स. पूर्वी १००० वर्षाच्या सुमारास रचिले. आतां इलियड व वैदिक ग्रंथ यांच्या भाषा तर इतक्या भिन्न आहेत की, या दोन (ग्रीक व हिंदु ) लोकांची फाटाफूट झाल्यावर दोघांच्या भाषांमध्ये इतकें भिन्नत्व यावयास हजारों वर्षे लोटली असली पाहिजेत. ह्मणून ओरायन अथवा मगशीर्ष यांच्या गोष्टी रचल्या गेल्यानंतर व वसंतसंपात कृत्तिकांत येण्यापूर्वी, ह्मणजे इ. स. पूर्वी ३५०० ते ३००० वर्षांच्या सुमारास, ग्रीक व हिंदु यांची फाटाफूट झाली असें झणणे अगदी रास्त होईल. सरते शेवटी, आपल्या अति कुशाग्र बुद्धीच्या व महाविद्वान् ब्रह्मविदांचे व पंडितांचे, वेद हे अगदी अनादि अतएव इश्वरदत्त