या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. आहेत असें जें मत आहे त्याचा थोडासा विचार करूं. श्रुतिसारखे प्रकट झालेले ग्रंथ ह्मणजे अनादीच असले पाहिजेत असा नियम नाही. एखाद्या विविक्षित वेळी ग्रंथ प्रकट झाला असें मानणारे लोक आहेत व असें मानतां येतें असें बायबल व कुराण यांच्या इतिहासावरून आपल्याला दिसेल. बायबल [ नवा करार ] ख्रिस्ताच्या वेळी म्हणजे सुमारे १९०० वर्षांपूर्वी, व कुराण महंमद पैगंबराच्या वेळी, मणजे सुमारे १३०० वर्षांपूर्वी, झाले हे सर्वांस माहीतच आहे. हे दोन्ही ग्रंथ प्रकट झालेले आहेत असे तत्तद्धर्मीय लोक मानतात, व ते वर लिहिलेल्या काळी प्रकट झाले असेंही ते मानतात. ह्मणजे प्रकट झालेले ग्रंथ अनादिच असले पाहिजेत असे नाही. असे जर आहे तर श्रुतिग्रंथ प्रकट झालेले आहेत एवढ्यावरूनच ते अनादि आहेत असें ह्मणणे बरोबर होणार नाही. ह्मणून ब्रह्मवादि लोकांचे तसे मत होण्यास दुसरे कांहीं कारण असले पाहिजे. या ब्रह्मवाद्यांपैकी कित्येक जण इ. स. पूर्वी कित्येक शतकें होऊन गेलेले आहेत. व तेव्हां वेद अनादि आहेत अशा पूर्व परंपरागत कल्पनेवरच त्यांनी आपले मत ठरविले होते, असें वरील विवेचनांत ठरविलेल्या वेदकालांवरून दिसते. ख्रिस्तीधर्मशास्त्राप्रमाणे पहातां जगाची उत्पत्ति इ. स. पूर्वी ४००० वर्षाच्या सुमारासच झाली असें आहे; ह्मणजे ख्रिस्ती ग्रंथकारांची प्राचीनत्वाच्या कल्पनेची मजलच बहुतकरून याहून पलीकडे जाऊ शकली नाहीं; व ४००० वर्षांपूर्वीच्या काळचें कांहींच न समजल्यामुळे मुळी जगाची उत्पत्तीच तेव्हां