या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. झाली असं त्यांनी ठरविले. आपल्या ब्रह्मवाद्यांनीही जवळजवळ असाच प्रकार केलासे दिसते. वर दाखविलेंच आहे की वंदकालांतील विशेष चळवळीचा भाग ह्मणजे इ. स. पूर्वी ४००० वर्षांच्या सुमाराचा होता, व कदाचित् त्याच्याही पूर्वीचा तो असेल असें म्हणावयासही थोडा बहुत आधार आहे. आतां वेदांचे स्वरूप अक्षरशः तसेंच न रहातां कालाने त्यांत कांहीं फरक झाला असेल, पण त्यांतील मतलब कांहीं बदलला नाही. ह्मणून इतक्या प्राचीन काळापासून ते आल्यामुळे, जैमिनि, पाणिनि व प्राचीन ब्रह्मवादी यांनी ते जगाच्या आरंभापासून ह्मणजे सर्व ज्ञात गोष्टींच्या आरंभापासून अस्तित्वात आहेत किंबहुना अनादि आहेत असे ठरविले. अशा रीतीने आपल्या प्राचीन वाङ्मयांत आढळणा-या गोष्टी व ज्योतिषविषयक उल्लेख यांच्या पूर्ण अनुरोधानें वेदकाल इ. स. पूर्वी ४००० वर्षांच्या सुमारास जर निश्चित केला, तर वेदकालासंबंधानें भारतीय व यूरोपीय आणि प्राचीन व अर्वाचीन पंडितांमध्ये प्रचलित असलेल्या गोष्टी व मते यांचा अगदी समाधानकारक रीतीने उलगडा करितां येतो. याप्रमाणे सर्व गोष्टींचा यथास्थित उलगडा होत असल्यामुळे वर नमूद केलेल्या कालांच्या योगानें आर्यसुधारणेच्या अति प्राचीन काळाची मर्यादा हल्लीच्या ज्ञानाच्या स्थितीत शक्य तितक्या बरोबर रीतीने ठरवितां येते की नाही, हे निश्चित करण्याचे काम विद्वानांकडे सोपविले पाहिजे.

  • मळ पुस्तक रा. टिळक यांनी स० १८९३च्या सुमारास लिहिले. आज मितीला त्यांतील बहुतेक मते सर्वमान्य झाली आहेत.