या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०० वेदकालनिर्णय. हा काल ठरविण्यास ज्या साधनांचा उपयोग केला आहे तें साधन आकाशांतील कधीही न चुकणारे व कधीही बंद न पडणारे असें जें सृष्टीचे घड्याळ ते होय. याहून अधिक खात्रीलायक साधन मिळणे शक्यही नाही, असें ह्मणावयास मुळीच हरकत नाही. वरील विवेचनांत ज्या गोष्टी पुराव्यासाठी म्हणून घेतल्या आहेत त्या या जगांतून अजिबात नाहीशा होण्याचा अनिष्ट प्रसंग एक दोन वेळ आला होता. ग्रीक लोकांनी ईजिप्शियन् लोकांपासून ज्योतिःशास्त्राची परिभाषा जेव्हां उचलली, त्या वेळी या सर्वच गोष्टी नाहींशा व्हावयाच्या; पण सुदैवाने ओरायन वगरे नांवे व तत्संबंधाच्या गोष्टी एवढ्या, त्या तडाख्यांतून बचाऊन निघाल्या. यानंतर त्यांच्यावर दुसराही तसाच प्रसंग आला होता. नेल्सन व नेपोलियन यांनी मोठमोठे पराक्रम केल्यामुळे त्यांच्या सन्मानार्थ व त्यांचे नांव चिरस्थायी व्हावे म्हणून इंग्लंड व जर्मनीमध्ये असा बूट निघाला होता की, मृगशीर्षपुजाला त्याचे पूर्वीचे ओरायन हे नांव बदलून नेल्सन किंवा नेपोलियन असें नांव द्यावें. परंतु ओरायनच्या सुदैवाने हाही प्रसंग टळला; व आजमितीस साहसप्रिय व देदीप्यमान असा तो ओरायन आपला परिचारक जो कॅनिस | श्वान ] त्या सह, नेल्सन अथवा नेपोलियन यांच्या कालापेक्षा किती तरी पटीने अधिक महत्वाच्या व पवित्र अशा, आर्य लोकांच्या इतिहासातील एका पूर्वकालाचे आपल्याला स्मरण देत आहे. ॐ समाप्त