या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मागें केव्हां तरी तो चालू होता हे उघड होते. त्या संहिताकालाच्या पूर्वी वसंतसंपात मृगांत होता हे दीक्षित कबूल करतातच. एवंच तो वर्षारंभ उदगयनी होणाराच होता हे टिळकांचें ह्मणणेच खरे दिसते. मार्गशीर्ष महिना वर्षारंभाचा महिना होता हे दाखविण्यास दीक्षितांनी अलबिरुणीच्या ग्रंथाचा आधार दिला आहे. ते ह्मणतात-" त्याने [ अलबिरुणीनें ] लिहिले आहे की, सिंध वगैरे प्रांतांत मार्गशीर्षात वर्षारंभ होतो." पण हा वर्षारंभ उत्तरा. यणाबरोबरचाही नव्हे, वसंतारंभींचाही नव्हे हे वर व पुढे पुस्तकांत सांगितलेच आहे. मग तो दुसऱ्या कोणत्या प्रकारचा -- असेल तर कोण जाणे. याप्रमाणे दीक्षितांनी काढलेल्या दोन आक्षेपांचा थोडा विचार केला. आता हे आक्षेप खरे आहेत असे जरी क्षणभर मानले तरी त्यावरून टिळकांनी काढलेल्या अनुमानांना कांहीं बाध येत नाही, हे दीक्षितांनीही सांगितलेले आहे. या अनुमानासंबंधानें दीक्षित लिहितात की, “या अनुमानांनी वेदकालाची उत्तर- अलीकड मर्यादाच काय ती स्थूलमानाने निश्चित करता येते. त्याची पूर्व पर्मा बडयो मर्यादा कोणी ठरवावी ? ती शकापूर्वी सुमारे ६००० वर्षे याहून अर्वाचीन नाही, एवढें खास. त्याच्या पूर्वी वेदमंत्र कधीं प्रकट झाले हे कोणासही सांगता येणार नाही."