या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. ( माधवभट्टांनी, इन्द्राणीसाठी तयार केलेलें हविर्द्रव्य वृषाकपि [ इन्द्रपुत्र ] रूपी कोणी मृगानें दूषित केले ह्मणून ती इन्द्रास ह्मणते असा या सूक्ताचा संदर्भ घेतला आहे. प्रथम ऋचेत सांगितल्याप्रमाणे इन्दाणीने इन्द्राला सांगितल्यावरही इन्द्र वृषाकपी. मागून जाऊ लागला, तेव्हां इन्द्राणी पुनः त्यास ह्मणते.) अर्थ:-हे इन्द्रा वृषाकपीच्या मागून तूं त्वरेनें धांवतोस व सोमपानासाठी इतर कोठे जात नाहींस (हे कसे ?) इन्द्र विश्वाच्या इ० [यांत परा झणजे वृषाकपि जिकडे गेला तो प्रदेश होय.] ॥२॥ किमयं त्वां वृषाकपिश्चकार हरितो मृगः । यस्मा उरम्यसीदु न्वयों वां पुष्टिमद्वसु विश्व० ॥ ३ ॥ ( अनुक्रमणीला अनुसरून सायणाचार्य ही ऋचा इन्द्राणीचीच समजतात. त्यांचा अर्थः-" [हे इन्द्रा, ] या [ वृषाकपिरूपी ] हरितवर्ण मृगाने तुझें असें काय [प्रिय ] केले आहे की त्याला तूं एखाद्या उदार मनुष्याप्रमाणे पोषयुक्त धन द्यावें ? इंद्र०" परंतु कांहीं जर्मन पंडित ही ऋचा इन्द्राच्या तोंडी घालितात.) अर्थः-(हे इन्द्राणि, ) या हरितवर्ण मगानें तुझें असें काय ( नुकसान ) केले की तूं त्यावर इतकें रागवावें ? तें कांहीं पोषयुक्त धन होते की काय ? इन्द्र विश्वाच्या उत्तरभागांतच आहे ॥ ३ ॥