या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. यममं त्वंवृषाकपि मयमिन्द्राभि रक्षसि ।। ' श्वावस्य जंभिषदपि कर्णे वराहयुर्विश्व० ॥ ४ ॥ मया तष्टानि मे कपिय॑क्ता व्यदूदुषत् । शिरो न्वस्य राविषं न सुगं दुष्कृते' भुवं विश्व० ॥५॥ (दुसऱ्या ऋचेत, इन्द्राच्या वृषाकपीविषयींच्या आवडीबद्दल इन्द्राणी त्याजवर रागावली. परंतु एवढ्याने तिची तृप्ति न होऊन ती त्यास आणखी ह्मणते.) अर्थः हे इन्द्रा, ज्या अर्थी तूं आपल्या प्रिय अशा वृषाकपीचें रक्षण करतो आहेस त्या अर्थी वराहाची इच्छा करणारा कुत्रा त्याच्या कर्णाचा चावा घेवो. ( कारण, ) या कपीने माझे आवडते आज्ययुक्त पदार्थ नासून टाकिले. (ह्यणून ) खरोखर मी त्याचे डोके नुकतेच कापून टाकले आहे; कारण दुष्कृति करणाराला सुख होऊ नये, इंद्र विश्वाच्या इ० ॥ ४, ५ ॥ [आकृतीत दाखविल्याप्रमाणे मृगशीर्षाचा आकार कल्पिल्यास मृगाच्या कानाचा चावा घेणारा कुत्रा झणजे कनिस मेजर (श्वान) ऊर्फ व्याध होय हे सहज समजेल.] - न मत्स्त्री सुभसतरा न सुयाशुतरा भुवत् । न मत्प्रतिच्यवीयसी न सक्थ्युद्यमीयसी विव० ॥६॥ ( यांत इन्द्राणी आपली धन्यता मानून घेते आहे. ती ह्मणते).