या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०६ वेदकालनिर्णय. अर्थः-माझ्याहून दुसरी कोणतीही स्त्री भाग्यवती नाहीं किंवा सुखी नाही. तसेंच माझ्याहून दुसरी कोणीही पतीला सर्व प्रकारे आनंद देणारी नाही. इन्द्र विश्वाच्या इ. ॥ ६ ॥ उवे अंब सुलाभिके यथेवांग भविष्यति । भस्मन्मे अंब सक्थि मे शिरो मे वीव हृष्यत विश्व०॥७॥ किं सुंवाहो स्वंगुरे पृथुष्टो पृथुजाघने । किं शेरपनि नस्त्वम॒भ्य॑मीषि वृषाकपि विश्व० ॥ ८॥ (अनुक्रमणीला अनुसरून सायणाचार्य या ऋचा अनुक्रमें वृषाकपि व इन्द्र यांजकडे लावितात. परंतु त्याप्रमाणे पहिलीचा अर्थ नीट जमत नाही. करितां दोन्हीही इन्द्राच्याच आहेत असे समजल्यास बरें. सायणाचार्यांचा अर्थः हे भाग्यशालि माते तूं ह्मणतेस तसेंच होवो. माझ्या पित्याला [ इन्द्राला ] तुझें सर्व शरीर आनंद देवो इ. यांत मे याचा अर्थ मला असा साधा न घेतां मे पितरं असा घ्यावा लागतो. ह्मणून इन्द्राच्या तोंडी हे शब्द चांगले शोभतात.) । अर्थ:-हे भाग्यशालि स्त्रिये, तूं ह्मणतेस तसेंच सत्य आहे. तुझे सर्व अवयव ( भसत् , सक्थि, व शिर ) मला सुखदायीच आहेत. ( पण ) हे शोभन स्त्रिये ( सुंदर बाहुँ, सुंदर अंगुली, सुंदर केश, व सुंदर जघन असलेली ) हे शूरपत्नि, तूं आपल्या वृषाकपीवर एवढी कां रागावलीस ? इन्द्र विश्वाच्या उत्तर भागां. तच आहे. ॥ ७, ८॥