या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. अवीरांमिव मामयं शरारुरभि मन्यते । उताहमस्मि वीरिणींद्रपत्नी मरुत्सखा विश्व० ॥ ९ ॥ (इन्द्राणी त्यावर उत्तर देते.) - अर्थः हा घातुक ( मृग-वृषाकपि ) मला ( जणूं) अवीरा समजतो. पण मी वीरमाता, इन्द्राची पत्नी व मरुतांची मैत्रीण आहे. इन्द्र विश्वाच्या इ. ॥९॥ संहोत्रं स्म पुरा नारी समन वावं गच्छति । वेधा ऋतस्य वीरिणींद्रपत्नी महीयते विश्व० ॥ १०॥ इन्द्राणीमासु नारिषु सुभामहर्मश्रवम् । न ह्यस्या अपरं चन जरसा मरते पतिर्विश्व० ॥ ११ ॥ (जर्मन पंडित १० वी ऋचा वृषाकपीची, व ११ वी वृषाकपायीची समजतात. आचार्य दोन्ही इन्द्राच्याच समजतात.. कसेंही घेतले तरी अर्थामध्ये फारसा फेर होत नाही). अर्थः-सत्याची विधात्री, वीरप्रसवा व इन्द्रपत्नी अशी ही जी स्त्री ती यज्ञाला व संग्रामाला जाते व सर्वत्र तिची स्तुति होते. इन्द्र विश्वाच्या इ० । सर्व स्त्रियांमध्ये इन्द्राणी भाग्यवती आहे असें ऐकतो. कारण तिचा पति जो इन्द्र तो वयोहानि होऊन कधीही मरत नाही. ॥ १०, ११ ॥