या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९०८ वेदकालनिर्णय. नाहमिन्द्राणि रारण सख्युर्वृषाकपेक्रेते । यस्य॒दमप्यं हविः प्रियं दे॒वेषु गच्छति॒ि विश्व० ॥ १२ ॥ (ही ऋचा इन्द्राची आहे.) अर्थ:-हे इन्द्राणि ( माझा ) सखा जो वृषाकपि त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही. त्याचे हे आवडतें जलपूत हवि देवांकडे जाते. इन्द्र विश्वाच्या० इ० ॥ १२ ॥ वर्षाकपाय रेवति सुपुत्र आदु सुस्नुषे । घसत्त इन्द्र उक्षणः प्रियं काचित्करं हविविश्व० ॥१३॥ ( या ऋचेत वृषाकपायि या शब्दानें घोटाळा उडविलेला आहे. वृषाकपायि ह्मणजे वृषाकपीची आई असे कित्येक समजतात; व कित्येक वृषाकपीची पत्नी असे समजतात. ही ऋचा इन्द्राणीला उद्देशून असल्यामुळे दुसरा अर्थ घेतल्यास वृषाकपि ह्मणजे इन्द्र असे समजले पाहिजे. मागील ऋचेत सांगितलेलें वृषाकपीचे आवडतें हवि खाण्यासाठी इन्द्र इन्द्राणीजवळ परवानगी मागतो.) - अर्थ:-हे धनवति सुपुत्रे व चांगली सून असलेले इन्द्राणि, या तुझ्या इन्द्राला वृषभरूपी सुखकर व आवडतें हवि भक्षण करूं दै; (कारण) इन्द्र विश्वाच्या इ० ॥ १३ ॥ उक्ष्णोहि में पञ्चदश माकं पचन्ति विंशतिम् । उताहर्मनि पीव इटुमा कुक्षी घृणन्ति मे विश्व० ॥ १४ ॥