या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. १०९ अर्थः-माझ्या साठी एकदम पंधरा व वीस बैल [ यजमान ] शिजवितात. मी ही ते खाऊन लठ्ठ होईन; आणि माझ्या दोन्ही कुशी (त्यांनी ) भरून जातील. ॥ १४ ॥ [खरोखरीचे बैल शिजविण्याची चाल ऋग्वेदकाळीही नव्हती. ऋ. १, १६४, ४३ यांत उक्षाणं पृश्निमपचंत वीरास्तानि धमाणि प्रथमान्यासन्-“वीर्यशाली यजमान लट्ठ बैल शिजवीत असत. पण ते धर्म जुने होते " असें झटले आहे. २८ नक्षत्रे व सात ग्रह मिळून झालेले ३५ बैल या ठिकाणी उद्दिष्ट असावे असे वाटत]. वृषभो न ति॒ग्मशृंगोन्तप॒थेषु रोवत् । मथस्त इन्द्र शं हृदे यं ते' सुनोति' भावयुर्विश्व० ॥१५॥ न सेशे यस्य रंबतेंतरा सक्थ्या ! कर्तृत् । सेदाशे यस्य॑ रोमशं निषेदुपो विज़ुभते विश्व० ॥१६॥ न सेशे यस्थ रोमशं निषेदपो विजभते ।। सदीशे यस्य रंवतेतरा सक्थ्या ३ कपृद्विश्च ॥ १७ ॥ अर्थ:-(इन्द्राणीः-) तीक्ष्ण शृंगांचा बैल जसा गाईच्या कळपामध्ये गर्जना करितो व क्रीडा करितो (तसा हे इन्द्रा! तं मजजवळ क्रीडा कर). मंथनदंडाचा ध्वनि, व प्रेमाची इच्छा करणारी ( इन्द्राणी ) तुझ्यासाठी जो ( सोमरस ) काढिते तो, तुझ्या हृदयाला सुखकारक होवो. ॥ १५ ॥