या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११० वेदकालनिर्णय. । (१६ आणि १७ या दोन ऋचांत इंद्र व इन्द्राणी यांच्या मधला मैथुनसंबंधी संवाद वर्णिला आहे). अयमिन्द्र वृषाकपिः परस्वंतं हतं विदत् । असिं सूनां नवं चरुमादेवस्यान आचितं विश्व० ॥१८॥ म. अयमे मि विचाकशद्विचिन्वन्दासमार्य'। पिबामि पाकसुत्वनोमि धीरमचाकशं विश्व० ॥ १९ ॥ अर्थः-(याप्रमाणे खुष झाल्यावर इन्द्राणी म्हणते ) हे इन्द्रा ! दुसरा जो मारिलेला प्राणी (वृषाकपि नव्हे ) तो या वृषाकपीलाच घेऊ दे, आणि ( तो प्राणी कापून शिजविण्यासाठी ) एक शस्त्र, चूल, एक नवें भांडे आणि इन्धनाने भरलेली एक गाडी हीही त्याला घेऊंदे. ( याप्रमाणे इन्द्र मध्ये पडल्यामुळे वृषाकपि बचावला. इन्द्राणी ज्याचे डोके कापावयास तयार झाली तो मृग वृषाकपि नव्हे दुसराच कोणी द्वाड होता, असें इन्द्राणीने सांगितल्यावर, आर्य जो वृषाकपि त्याच्या संरक्षणाबद्दल आनंदित होऊन इन्द्र म्हणतो.) अर्थः—याप्रमाणे मी दास व आर्य यांतील भेद पहात जात असतो. आणि सोमरस काढणाऱ्यांपासून मी तो पितों व धीमान् अशा [यजमाना ] कडे लक्ष ठेवितो. ॥ १८, १९ ॥