या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. धन्वं च यत्कृतत्रंच कतिस्वित्ता वि योजना।। नेदीयसो वृषाकपेस्तृमेहि गृहाँ उप विश्व० ॥ २० ॥ (या ऋचेत इन्द्र वृषाकपीला आपल्या स्वतःच्या घरी जाऊन, मग आमच्या घरी ये असे सांगतों आहे. आतां प्रश्न असा की, वृषाकपि व इन्द्र यांची ही घरे आहेत कोठे ? धन्च, कुंतत्रं, आणि नेदीयम् यांचे सायणाचार्यानीं निरुदक व अरण्यरहित देश, कर्तनीय अरण्य [ज्यांतील वृक्ष तोडावयाचे आहेत असें] व अतिशयेन समीपस्थ [ शत्रुगृह ] असे अर्थ दिले आहेत. पण हे संदर्भाला जुळत नाहीत. वृषाकपि हे सूर्याचे कोणते तरी स्वरूप आहे. त्याला अरण्यांत जाऊन काय करावयाचें ? व हे अरण्य तरी कोणते ? ऋ. १-३५-८ यांत धन्व याचा अर्थ आकाश असा सायणाचार्यानीच दिला आहे. तोच अर्थ येथे घेण्यासही काही हरकत नाही. त्याला पुढे कुंतत्रं म्हणजे तोडलेले असे म्हटले आहे. यावरून हा आकाशाचा भाग म्हणजे दक्षिण गोलार्ध ऊर्फ पितृयान होय. " यत्रावरोधनं दिवः" [ऋ. ९, ११३-८] यांत आलेले अवरुद्ध आकाश व हे धन्व द्वंतत्रं ही एकच होत. दक्षिण गोलार्धाची पूर्ण माहिती नसल्यामुळे त धन्व कतिस्वित् कांहीं ] योजनें आहे असे मोघम म्हटले आहे. असो. तर यावरून इन्द्रानें वृषाकपीला आपल्या घरी म्हणजे दक्षिण गोलार्धात जावयास सांगितले असे झाले.