या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११२ वेदकालनिर्णय. रळ अर्थ "नेदी झालेला असा आहे. प आतां, दुसऱ्या चरणाचा सरळ अर्थ “नेदीयसाहून आमच्या घरी ये" असा आहे. यांत नेदीयस् शब्दासंबंधानेही घोटाळा झालेला आहे. 'अन्तिकवाढयोर्नेदसाधौ' या पाणिनीच्या सूत्रांत [ ५-३-६३ ] अन्तिक शब्दाला ईयस् इष्ठ प्रत्ययांपूर्वी नेद असा आदेश होत असतो, असे सांगितले आहे. परंतु अन्तिक-- पासून नेद शब्द कोणत्याही रीतीने मिळू शकत नाही. ह्मणून, नेदीयस् ह्या शब्दाचे मूळ रूप में नेद तें पाणिनीच्या वेळी नाहींसें झाले होते, परंतु व्याकरणकार या नात्याने पाणिनीला सर्व शब्दांची व्यवस्था लावणे भाग असल्यामुळे तो नेदीयस् याचा अन्तिक शब्दाशी संबंध लावून देवून मोकळा झाला, असें ह्मणावे लागते. पण असें मटल्याने नेदीयस् याचा पाणिनीच्या वेळी जवळचा याखेरीज दुसरा कांहीं एक अर्थ नव्हता असे मानण्याचे कारण नाही. पाणिनीने त्याच्या वेळी विशेष प्रचलित असलेला त्याचा अर्थ घेतला असेल व त्याचे मूळरूप कांहीं नाहीं असे पाहून त्याने तसाच अर्थ असलेल्या अन्तिक शब्दाला त्याचे मूळरूप मानिले असेल. कारण त्याचा उद्देश अर्थ सिद्ध करण्याचा नसून रूपसिद्ध करण्याचा आहे. इंग्रजीत ( nether ) नेदर असा शब्द आहे, व त्याचा खालचे असा अर्थ आहे. हा शब्द नेद या शब्दाला अर हा तारतम्यदर्शक प्रत्यय लावून झालेला आहे, व तो लो--अर (low-er ) या शब्दाशी समानार्थक आहे. याच मूळ शब्दावरून beneath [ बिनीथ-खालीं] under-neath (अंडर-नीथ) वगर शब्द झाले आहेत. हा नेदर शब्द व संस्कृत नेदीयस् हे दोन्ही नद