या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११३ वैदकालनिर्णय. या एकाच मूळरूपापासून झाले आहेत व म्हणून नेदीयस् याचा अर्थ खालचा असाच केला पाहिजे. असा अर्थ करावयास दुसराही आधार आहे. ऋग्वेदांत इतर ठिकाणी आलेल्या नेदीयम व नेदिष्ठ शब्दांवरून त्यांचा असा अर्थ जरी निश्चित करता येत नाही, तरी ब्राह्मणांतील कांहीं स्थलांवरून तो तसा निश्चित करता येतो. ऐतरेय ब्राह्मणांत ( ६-२७ ) " उपरिष्टान्नेदीयसि " यांत उपरिष्टात् व नेदीयस् यांत विरोध दाखविला आहे. तसेंच काठक संहितेत " नेदिष्ठादेव स्वर्गलोकमारोहति ।" ह्मणजे 'नेदिष्ठ लोकाहून स्वर्गलोकांत आरोहण करितो' असे वाक्य आहे. या आरोहण शब्दावरून नेदिष्ठ झणजे खालचा लोक असा अर्थ उघड दिसतो. तांड्य ब्राह्मणांतही " यथा महावृक्षस्याग्रं सृप्त्वा नेदीयः संक्रमात् संक्रामत्येवमेतन्नेदीयः संक्रमया नेदीयः संक्रमासंक्रामति ।" ह्मणजे "ज्याप्रमाणे वृक्षाच्या अग्रभागी हळूहळू गेल्यावर ( मनुष्य ) हळूहळू खाली येतो त्याप्रमाणे स्वर हळूहळू उंच करून मग क्रमाने खाली आणितो " असे वाक्य आले आहे. या सर्व ठिकाणी नेदीयस् याचा ' जवळचा ' असा अर्थ सायणाचार्यानी पाणिनीला अनुसरून केला आहे. पण वर सांगितल्या. प्रमाणे पाणिनीचा उद्देश अर्थ सांगण्याचा नसून रूप सिद्ध करण्याचा आहे. नेदीयस् या ईयस्प्रत्ययान्त शब्दाचे मूळरूप कांहीं आढळले नाही, एवढ्यावरून त्याने अन्तिक ह्या त्याच्या एका अर्थाने समान असलेल्या शब्दाला त्याचे मूळरूपं असें मानिलं. यावरून नेदीयस् याचा अन्तिक मणजे जवळचा एवढाच अर्थ