या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तात्पर्य, वेदकालासंबंधाने टिळकांनी घातलेल्या मर्यादा आतां सर्वास ग्राह्य झाल्या आहेत. दुसऱ्याही अगदी निराळ्या गोष्टींवरून जर्मनीतील बान युनिव्हर्सिटीतील डाक्टर जाकोबी याने हीच अनुमाने काढिली आहेत. शिवाय आपले कडील विद्यमान ज्योतिःशास्त्रविशारद रा. रा. वें. बा. केतकर यांनी तैत्तिरीय ब्राह्मणांतील [३, १, १५] " बृहस्पतिः प्रथमं जायमानः तिष्य नक्षत्रं प्रादुर्बभूव" । या वचनावरून त्याचे गणित करून बृहस्पतिकृत तिष्य नक्षत्राच्या अधिक्रमणाचा काळ इ. स. पूर्वी ४६५० वर्षे असा काढिला आहे. याही गोष्टीवरून त्या अनुमानास आणखी वळकटी येते. आता यापुढे मोक्षमुल्लर, हौ वगैरे लोकांनी काढिलेल्या वेदकालावर आपणांस मुळीच भिस्त ठेवावयास नको. असो. अशा प्रकारचे पुस्तक मराठी वाचकांस जरासें कठीण वाटण्याचा संभव आहे. परंतु खरोखर तें कठीण नाही. कारण हे समजण्याला ज्योतिःशास्त्राची जरी माहिती थोडीशी पाहिजे, तरी गणिताची त्यामध्ये मुळीच भानगड नाही. काही ज्योतिःशास्त्रविषयक नांवांचे अर्थ मी टीपांत दिलेले आहेतच. त्यावरून एकंदर मजकूर समजण्यास सुलभ होईल. तरी यासंबंधानें कै० दीक्षितांच्या ज्योतिर्विलास नांवाच्या पुस्तकाची पहिली कांही प्रकरणे वाचणे सोईचे होईल. त्यांत विशेषतः दिव्य भ्रमण, देवांची मंदिरें,

  • आक्टिक होम इन धि वेदाजची प्रस्तावना पान १ पहा.