या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

११४ वैदकालनिर्णय पाणिनीचे वेळी होता असे काही म्हणता येत नाही. म्हणून त्याचा “ खाली ” असा व्युत्पत्तीवरून निघणारा अर्थ घेणेच योग्य आहे. शिवाय या सूक्ताच्या आंकडकडव्यांत उत्तर हा जो शब्द आला आहे त्याचा व नेदीयस् याचा विरोध अशा रीतीने चांगला जमेल. ' इन्द्राचे घर उत्तरेकडे आहे व वृषाकपि नेदीयस् म्हणजे खाली चालला आहे; आणि इन्द्र त्याला आपल्या घरी पुनः बोलावितो आहे;' हा या सूक्ताचा मथितार्थ होय. शरत्संपाताजवळून सूर्य खाली पडण्याचा संभव असतो अशी कल्पना फार पुरातन आहे. ऐतरेय ब्राम्हण (४-१८) आणि तैत्तिरीय ब्राम्हण (१-६-१२-१) यांत संवत्सर सत्रांतील विषुव दिवशी करावयाचे विधि सांगितले आहेत. त्यांत “ तस्य वै देवा आदित्यस्य स्वर्गाल्लोकादवपातादबिभयुस्तं त्रिभिः स्वगैर्लोकर वस्तात्प्रत्युत्तभ्नुवन् । ........ तेषु ( स्तोमेषु ) हि वा एष एतदध्याहितस्तपति । स वा एष उत्तरोऽस्मात्सर्वस्माद्भूतात्० ।" असें मटले आहे. “ सूर्य स्वर्गातून खाली पडेल ह्मणून देव भ्याले व त्यानी त्याला खालून स्तोमानी आधार दिला.... याप्रमाणे आधार मिळाल्यामुळे तो सर्वांहून उत्तर (वरचा ) झाला.” हे स्तोम शरत्संपातदिवशी ह्मणजे विषुवदिवशी दिले आहेत. या सर्व गोष्टींवरून प्रस्तुत ऋचेतही सूर्याच्या दक्षिण गोलार्धात उतरण्याचेच वर्णन आहे व इन्द्र वृषाकपीला म्हणजे सूर्याला पुनः आपलेकडे म्हणजे उत्तरेकडे बोलावितो आहे असे दिसते.)