या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

व पंचांग ही प्रकरणे अवश्य वाचावी. भारतीय ज्योतिःशास्त्र या पुस्तकाचाही बराच उपयोग होईल. मूळ ग्रंथकर्ते लोकमान्य टिळक यांनी हा सारांश प्रसिद्ध करण्यास परवानगी दिली याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. त्यांचे दोन्हीही ग्रंथ इंग्रजीत झाल्यामुळे मराठी वाचकांस त्यांचा लाभ होत नाही; तो व्हावा म्हणून हा प्रयत्न केला आहे. शेवटी रा. रा. दामोदर सांवळाराम आणि मंडळी यांनी हे पुस्तक छापून प्रसिद्ध करण्याचे अंगावर घेतल्याबद्दल त्यांचे आभार मानून, व ज्या बालवक्तमंडळावरून हे पुस्तक लिहिण्याची बुद्धि झाली, त्याला चिरायु करण्याविषयी विश्वनियन्त्या परमात्म्याची मनःपूर्वक प्रार्थना करून ही प्रस्तावना पुरी करितो. जगन्नाथाची चाळ, मुंबई । के. ल. ओगले. पौष वद्य १०, शके १८२९. ।