या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. C . आ पले वेद हे प्रस्तुत उपलब्ध असलेल्या सर्व ग्रंथांमध्ये प्राचीनतम आहेत. व याविषयीं आतां कोणासही हा शंका नाही. मानवजातीचा निदान त्यांपैकी आर्यशा खेचा तरी अति प्राचीन इतिहास समजण्यास वेदां सारखे दुसरे कोणतेच साधन नाही, अशी मॅक्समुल्लर प्रभृति पाश्चात्य संस्कृतज्ञ पंडितांची सुद्धा पूर्ण खात्री झालेली आहे. यासाठी या वैदिकऋचा सहजगत्या रचण्यास, आदिकवीं वाल्मिकी प्रमाणेच, अत्यंत प्राचीन अशा वैदिक ऋषींना ज्या काळी स्फूर्ति होत होती त्या काळाचे मान साधारणपणे तरी निश्चित करणे हे फार महत्वाचे आहे. आतां पर्यंत, वेद कालाशी तुलना केली असता ज्यांना अगदी अर्वाचीन ह्मणावे लागेल अशा गौतम बुद्धादिकांपासून तो शंकराचार्यांच्या हातून बौद्धधर्माचा पाडाव होऊन अद्वैत वेदांत मताची स्थापना होईपर्यंत घडलेल्या गोष्टींचा, कित्येक ग्रीक ग्रंथ, अशोक राजाचे शिलालेख तसेंच कित्येक चिनी प्रवाशांची वर्णने या व दुसऱ्या कित्येक कमीजास्त मह