या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णप. त्वाच्या साधनांच्या साहाय्याने, सरासरी कालानुक्रम लागला आहे, परंतु या कालाच्या पलिकडे गेले असतां आर्यावर्ताच्या इतिहासाविषयी निश्चित असें कांहींच समजत नाही. व त्या सर्वांत जुना परंतु मानव जातीच्या इतिहास-संशोधकास अत्यंत महत्वाचा असा . जो ऋग्वेद काल त्या संबंधाने तर सध्या केवळ अंधुक अंधुक - असे तर्कच चालले आहेत. तर मग वेदकाल निश्चित करणे शक्य तरी आहे की नाही ? या प्रश्नाने पुष्कळ प्राचीन व अर्वाचीन विद्वानांच्या बुद्धीला आजपर्यन्त चकविले आहे. व (टिळक ह्मणतात ) जरी आह्मी या विषयावर लिहिण्याचे धाडस केले आहे, तरी प्रस्तुत प्रश्नाचा सांगोपांग विचार करून “अखेरचा निकाल लावला असे काही ह्मणतां यावयाचे नाही. तरी या विवेचनाच्या योगाने आर्य लोकांच्या अति प्राचीन सुधारणाकाळावर थोडा तरी अधिक प्रकाश पडेल असे वाटते, परंतु ते ठरविण्याचे काम विद्वानांकडेच सोपविले पाहिजे. या विवेचनास सुरुवात करण्यापूर्वी वेदकालनिर्णय करण्याकरितां विद्वान् लोकांनी आजपर्यन्त कोणकोणत्या पद्धतींचा स्वीकार केला आहे, हे थोडं पाहूं. मॅक्समुल्लर प्रभृति लोकांनी भाषापद्धतीचा उपयोग केला आहे. या पद्धतींप्रमाणे एकंदर वेदकाळाचे

  • मूळ पुस्तक रा. टिळक यानी १८९३ च्या सुमारास लिहिले. आज मितीला त्यांतील बहुतेक मते सर्व मान्य झाली आहेत.