या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. छंदःकाल, मंत्रकाल, ब्राह्मणकाल आणि सूत्रकाल असे चार भाग होतात. अशाप्रकारचे चार भाग कल्पून प्रत्येक भागाला दोन दोनशे वर्षे देऊन मॅक्समुल्लरनें ऋग्वेदकालाचा अवधि ८०० वर्षांचा केला. व ज्या अर्थी हे सर्व काल "बुद्धाच्या कालाच्या -पूर्वीचे आहेत त्या अर्थी त्या कालापासून मागे ८०० वर्षे मोजली की, वेदकाल सुमारे इ. स. पू. १२०० वर्षांपर्यंत जाऊन ठेपतो. - परंतु ही पद्धति बरीच सदोष आहे. कारण या पद्धतीचाच स्वीकार करून निरनिराळ्या लोकांची निरनिराळी मतें झाली आहेत. कोणी वर सांगितलेल्या चार भागांऐवजी तीनच समजतात. कोणी चार समजूनही प्रत्येक भागाला दोनशे वर्षे देण्याऐवजी अधिक देतात. डॉ. हौ याने या प्रत्येक भागाला ५०० वर्षे देऊन वेदकालाचा आरंभ इ. स. पूर्वी २४०० पासून २००० पर्यंत ठरविला आहे. ह्मणून अशा रीतीने ही पद्धति अगदी अनिश्चित असल्यामुळे वेदकाल निश्चित करण्याकरितां हिचा फारसा उपयोग होणार नाही. - आतां दुसरी ज्योतिषपद्धति, वेद, ब्राह्मणे व सूत्रे यांत ज्योतिषाविषयी जे काही उल्लेख व संबंध आहेत, त्यांवरून आपणांस आर्यसुधारणेचा अगदी जुना काल निश्चित करता येईल असे बऱ्याच जणांस वाटत होते, परंतु या दिशेच्या प्रयत्नांस त्यांस वाटले होते तितकें यश आले नाही. कारण सांप्रत जे ज्योतिषविषयक ग्रंथ उपलब्ध

  • गौतम बुद्ध इ० स० पूर्वी ५०० वर्षाच्या सुमारास होऊन गेला असे विद्वान् लोकांचे मत आहे.