या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. आहेत त्यांपैकी वेदागज्योतिष खेरीजकरून सगळे अर्वाचीन काळचे आहेत. या ग्रंथांमध्ये ग्रीक लोकांच्या ज्योतिषाचीही भर असल्यामुळे, तसेच त्यांमध्ये कालमापनाच्या रीती निरनिराळ्या असल्यामुळे व दुसऱ्या कित्येक कारणांमुळे, अर्जाचीन ग्रंथांमध्ये आढळून येणाऱ्या ज्योतिषविषयक गोष्टींचा बरोबर अर्थ लावणे बरेंच दुर्घट होते. याशिवाय दुसऱ्याही काही भासमान अडचणी या पद्धतींत आहेत. उदाहरणार्थ काही लोकांनी वेदाइतक्या जुन्या काळी अयनांतबिंदु, *संपातबिंदु, वगैरे गोष्टींचे यथार्थ ज्ञान होणे संभवनीय नाही, अशी शंका काढिली आहे. या शंकांमध्ये तथ्य किती आहे हे आपण पुढे पाहूं. सध्या इतके सांगणे अवश्य आहे, की असल्या प्रकारच्या शंका काढून, वेदांमध्ये आढळणाऱ्या

  • सूर्याचा ( वास्तविक पृथ्वीचा ) नक्षत्रांतून फिरण्याचा मार्ग ह्मणजे क्रन्तिवृत्त, व आकाशाचे विषुववृत्त ही दोन्ही एका पातळीत नाहीत. त्यांमध्ये सुमारे २२३ अंशांचा कोन आहे. ह्मणजे ही दोन वर्तुळे एकमेकांस दोन बिंदूत छेदितात. ह्या छेदनबिंदूंस संपात म्हणतात. यांपैकी ज्या संपाताजवळ सूर्य आला हणजे वसंत ऋतूला आरंभ होतो तो वसंतसंपात व दुसरा शरत्संपात. या बिंदूपासून ९० अंशावर असलेले जे दुसरे बिंदू, त्यांस अयनबिंदू ह्मणतात. एक उत्तरायण व दुसरा दक्षिणायन बिंदु. आतां या वर सांगितलेल्या वर्तुळांपैकी पहिले झणजे क्रांतिवृत्त हे स्थिर आहे; परंतु दुसरे जे विषुववृत्त तें चल आहे. त्यामुळे त्यांना छेदणारे संपात बिंदूही चल आहेत. संपातचलन किंवा अयनचलन में ह्मणतात ते विषुववृत्त चल असल्यामुळेच होते.