या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिणय.. प्रत्यक्ष वर्णन केलेल्या अशा ज्योतिषविषयक गोष्टींनांही काही संस्कृतज्ञ पंडितांनी निरर्थक म्हटले आहे. परंतु या ज्योतिष पद्धतीला नांवे ठेवण्यांत पाश्चात्य पंडित लोकांनी फाजील सावधपणा दाखविला आहे. या पद्धतीमध्ये अडचणी नाहींत असें नाही. परंतु या लोकांनी त्याचा विनाकारण फाजील बाऊ करून ठेविला आहे. मुख्य मुद्दा लक्षात ठेऊन त्यांत मिसळलेल्या इतर वायफळ गोष्टी त्यांतून काढून टाकण्याचा योग्य प्रयत्न न झाल्यामुळे अशा प्रकारच्या चुका झाल्या आहेत. कित्येक बेंटलेप्रभृति लोकांनी या पद्धतीचा स्वीकार करतानां पुराणांतील गोष्टींवर व शब्दव्युत्पत्तीवर बराच भार ठेविला आहे. परंतु त्या गोष्टींना प्रत्यक्ष वेदांमध्ये किती आधार आहे हे पहाण्याचा त्यांनी प्रयत्न केला नाही. कारण पुराणांतील गोष्टी वेदांतील गोष्टींची कित्येक रूपान्तरे होऊन झाल्या आहेत व असें होतांना त्यामध्ये दुसन्याही कित्येक गोष्टी मिसळल्या आहेत. यासाठी त्यांना वेदांमध्ये आधार सांपडल्यावांचून त्यांवरून कोणतीही निश्चित अनुमान काढणे रास्त होणार नाही. ह्मणून पुढील विवेचनांमध्ये, संहिता ब्राह्मणे व त्या सर्वात जुना जो ऋग्वेद त्यांमध्ये आढळणान्या उल्लेखांवरून भारतीय वाङ्मयाचे भौगोलिक व ऐतिहासिक आधारांवरून ठरविलेलें प्राचीनत्व पूर्णपणे स्थापन करितां येईल असे दाखविण्याचा प्रयत्न करावयाचा आहे. असल्या प्रकारचे प्रयत्न गोडबोले, दीक्षित प्रभृति भारतीय ज्योतिर्विदांनी केले आहेत, परंतु त्यांकडे जावें तितके विद्वानांचे लक्ष गेले नाही. पुढील विवेचन त्यांनी चालू केलेल्या उपपत्तीचीच पूरणिका आहे, असें मटल्यास हरकत नाही.