या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय, आतां या तजविजीचे बरोबर खरूप जरी समजले नाही, तरी यज्ञयागसंबंधीं ग्रंथांवरून इतके दिसेल की, चंद्राचे वृद्धिक्षय, ऋतूंचे बदल व सूर्याची दक्षिण व उत्तर अशी दोन अयनें ह्या त्या काळी कालमापनाच्या मुख्य मुख्य खुणा होत्या. दुसरी विशेष गोष्ट अशी आहे की, जुने याग किंवा सत्रे यांतील मुख्य गोष्टी व संवसरांतील मुख्य गोष्टी या एकच आहेत, ही सत्रे एक एक वर्षाची असत व ती सूर्याच्या वार्षिक गतीच्या अनुरोधानेच केवळ बसविलेली असत. त्यांचे सहा सहा महिन्याचे दोन भाग करून प्रत्येक महिन्याला तीस तीस दिवस दिलेले असत. या दोन भागांच्या बरोबर मध्ये विषूवान् म्हणजे मध्य दिवस अथवा विषुवदिन हा असे. यावरून असे उघड दिसते की वैदिक ऋषींनी आपले पंचांग मुख्यत्वेकरून यागकर्मासाठीच केले होते, व तसेंच यज्ञयागांच्या नियमित करण्याच्या योगाने पंचांगाची व्यवस्थाही बरोबर रहात असे. या वार्षिक सत्रांमध्ये आहुतीचे काल म्हणजे रोजचे प्रातःकाळ व सायंकाळ, दर्शमास, पूर्णमास व प्रत्येक ऋतूचा व अयनाचा आरंभ हे होते.* अशा रीतीने सत्र पुरे झाले म्हणजे वर्षही पुरे होत असे. व ह्मणून संवत्सर व यज्ञ हे दोन शब्द बहुतेक समानार्थकच झाले होते. " संवत्सरः प्रजापतिः । प्रजापतिर्यज्ञः ।" या ऐतरेय ब्राह्मणांतील व “ यज्ञो वै प्रजापतिः ।

  • पहा-बौधायन सूत्र २-४-२३, मनुस्मृति ४.२५, २६. 'ऐतरेय ब्राह्मण २-७; ४-२२ तैत्तिरीय संहिता २-५-७-३ आणि ७-५. ७-४ तसंच ७-२-१०-३.