या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदका निर्णय. संवत्सरः प्रजापतिः ।" या तैत्तिरीय संहितेंतील वाक्यांवरून तर हे अगदीं उघड होते. असो.. - आतां या संवत्सराचे ऊर्फ यज्ञाचे जे मुख्य भाग त्यांचं थोडंसें परीक्षण केले पाहिजे. कालमापनामध्ये मूल परिमाण सावन दिवस हैं धरीत असत. अशा तीस सावन दिवसांचा एक महिना व अशा बारा महिन्यांचे ह्मणजे ३६० सावन दिवसांचे एक वर्ष होत असे. परंतु तुलनात्मक व्युत्पत्तिशास्त्रावरून प्राचीन आर्य लोक चंद्रावरूनच महिने ठरवीत असे दिसते. परंतु तीस सावन दिवसांचा महिना चांद्र महिन्याबरोबर जमणे शक्य नाही. ह्मणून सावन व चांद्र महिन्यांचा मिलाफ करण्यासाठी काही सावन महिन्यांतून एक एक दिवस गाळीत असत. परंतु पुढे चांद्र व सौर वर्षांचाही मिलाफ करणे जरूर पडले; व त्यासाठी अधिक दिवस अथवा अधिक मास धरण्याची युक्ति प्राचीन आर्य लोकांनी काढिली होती, असे दिसते. कारण तैत्तिरीय व वाजसनेयी संहितेमध्ये अधिक महिन्याचा उल्लेख असलेली बरीच वाक्ये आहेत. व ऋग्वेदाच्या पहिल्या मंडळांतही, " वेद मासो धृतव्रतो द्वादश प्रजावतः । वेदा य उपजायते । ” असें मटले आहे. ही अधिक दिवस किंवा

  • बारा चांद्र मास ह्मणजे एक चांद्र वर्ष, चांद्र मासही दोन प्रकारचे असतात. एका नक्षत्रांत आल्यापासून पुन्हा त्याच नक्षत्रांत यावयास जो काल लागतो तो नाक्षत्र मास, व एका अवास्येपासून दुसऱ्या अमास्यपर्यतचा जो काल त्यास अमा मोस म्हणतात. नेहमी अमा मासच घ्यावयाचे असतात.

1 ऋ. १.२५.८.