या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णप. ठरविण्याचे साधन ह्मणजे रोज सकाळी सूर्याजवळ असलेल्या स्थिर तारका पहाणे हेच होते. सूर्यसिद्धांताच्या काळी यद्यपि अयन गतीचा शोध लागला होता, तरी त्यांत सौर वर्षमान नाक्षत्रच धरिलें आहे. व या गतीविषयी कोणत्याही वैदिक ग्रंथांत प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्ष उल्लेख नाहींत. ह्मणून यज्ञ उर्फ संवत्सर हा आयनिक सौर नसून नाक्षत्र सौर होता, यांत संशय नाही. परंतु हे वर्षमानः धरिल्याने सुमार दर. दोन हजार वर्षांनी ऋतुचक्राशी मेळ ठेवण्यासाठी वर्षारंभ बदलावा लागेल व अशा प्रकारचे फेरफार वर्षारंभांत खरोखरच केलेले आहेत; ही गोष्ट वरील विधानास ह्मणजे वर्षमान सांपातिक नसून नाक्षत्र होते या म्हणण्यासच जास्त पुष्टी आणते.. आतां हा वर्षारंभ केव्हां धरीत असत हे पहाणे आहे. वर । सांगितलेच आहे की संवत्सर व यज्ञ हे शब्द बहुतेक समाना-- र्थकच होते. व ह्मणून त्या दोघांचा आरंभही अर्थात् एकदमच होत असांपातिक वर्ष नाक्षत्र वर्षापेक्षां स्थूलमानाने एका घटिकेने लहान आहे. मगन आज जर चैत्रारंभी वसंत सुरू झाला तर सुमारे १८०० वर्षांनी किंवा अगदी स्थूल मानाने म्हटल्यास २००० वर्षांनी तो फाल्गुनारंभी होऊ लागेल. म्हणून वर्षारंभ जर वसंतारंभी ठेवावयाचा असेल तर तो २००० वर्षांनी चैत्रांत न करतां फाल्गुनांत करावा लागेल व आणखी दोन हजार वर्षांनी माघांत करावा लागेल. अशा रीतीने दर दोन हजार वर्षांनी वर्षारंभ एक एक महिना मागे आणावा लागेल. संपात चल आहेत व वसंतसंपातांत सूर्य येईल त्या वेळेस वसंत ऋतूस सुरुवात होते. म्हणजे एक ऋतपर्यंत म्हणजे सांपातिकसौर वर्ष असा अर्थ झाला हे स्पष्टच आहे.