या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. सत्रांला जरी लागू नसले, तरी निदान वर्षाला लागू असलेच पाहिजे; मणजे अर्थात् विषूवान् हे नांव सार्थ होण्यास वर्षारंभ संपातीं झाला पाहिजे. आतां उत्तरायण या शब्दाचेही दोन अर्थ होऊ शकतात. एक- वर सांगितलेला ह्मणजे मकरपासून कर्क संक्रमणापर्यतचा काळ, व दुसरा ह्मणजे वसंत संपातापासून तो शारद संपातपर्यन्तचा काळ. पहिल्या अर्थाप्रमाणे सूर्य उत्तरेकडे वळला की उत्तरायण सुरु होते, व दुसऱ्या अर्थाप्रमाणे उत्तर गोलार्धात सूर्य जाऊ लागला ह्मणजे उत्तरायण होते. पहिल्या अर्थाप्रमाणे वर्षारंभ मकरसंक्रमणी व दुसन्या अर्थाप्रमाणे तो वसंतसंपाती धरला पाहिजे; परंतु वार्षिक सत्रांतील मधल्या . दिवसाला विषूवान् दिवस ह्मणणे तसेंच वसंतांला ऋतूचं मुख ह्मणणे व आग्रयणेष्टि अथवा अर्धवार्षिक यज्ञ दर वसंत व शरद् या ऋतूंमध्ये करावे लागणे, या गोष्टींचा विचार करतां वर दिलेल्या दोन अर्थापैकी दुसराच - विशेष ग्राह्य दिसतो व तोच खरा जुना अर्थ होय असे दिसते.

  • सूर्याचें क्षितिजावरचे उदयस्थान नेहमी एक नसते, हे सर्वास माहीत आहेच. वसंतऋतूला ज्या दिवशी आरंभ होतो, त्या दिवशी सूर्य बरोबर पूर्वेस उगवतो. त्यानंतर थोडा थोडा उत्तरेकडे उगवून तीन महिन्यांनी उत्तर सीमेवर जातो. व नंतर पुन्हा दक्षिणेकडे वळू लागतो; तो सहा महि. न्यांनी दक्षिण सीमेवर जातो. या सहा महिन्यांना दक्षिणायन व ह्मणून पुढच्या सहा महिन्यांना उत्तरायण ह्मणणे हा पहिला अर्थ, व पूर्वस उगवू लागून उत्तरेकडे वळून सीमेवर गेल्यावर पुनः मागे वळून पूर्वेस उगवं लागण्यास लागण या सहा महिन्यांस उत्तरायण ह्मणणे हा दुसरा अर्थ,

ते. ब्रा. मुखं वा एतत् ऋतूनाम् । यद्वसंतः । ( १-१-२-६).