या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. वैदिक ग्रंथांमध्ये उत्तरायणाचा जो संबंध आलेला आहे तो देवयान व पितृयान यांच्या वर्णनाच्या वेळेसच काय तो आहे. ऋग्वेदामध्ये देवयान वं पितृयान हे शब्द पुष्कळ वेळां आलेले आहेत. तरी देवयान या शब्दाचा अर्थ त्यांत कोठेही स्पष्ट केला नाही. बृहदारण्यक व छांदोग्य या उपनिषदांमध्ये देवलोक व पितृलोक यांचे सविस्तर वर्णन आहे.$ “अर्चिषोहरन्ह आपूर्यमाणपक्षमापूर्यमाणपक्षाद्यान्षण्मासानुदादित्य इति मासेभ्यो देवलोकं तेषां न पुनरावृतिः । धूमाद्रात्रिं रात्रेरपक्षीयमाणपक्षमपक्षीयमाणपक्षाद्यान्षण्मासान्दक्षिणादित्यइतिभासेभ्यः पितृलोकम् "। गीतमध्येही अशाच प्रकारचे वर्णन आहे. "अग्निोतिरहः शुक्लः षण्मासा उत्तरायणम्।" व लगेच पुढे "धूमोरात्रिस्तथा कृष्णः षण्मासा दक्षिणायनम् ।" असे म्हटले आहे. परंतु, जोपर्यंत सूर्य उत्तरेकडे असतो ते सहा महिने अथवा उत्तरायणाचे सहा महिने अशा अर्थाचे जे वर शब्द आले आहेत त्याचा अर्थ काय ? सर्व टीकाकारांच्या मते त्यांचा अर्थ मकरसंक्रमणापासून कर्कसंक्रमणापर्यंतचे सहा महिने असा आहे. परंतु हा अर्थवैदिक ग्रंथांतील वर्णनाच्या अगदी उलट आहे. वर सांगितल्याप्रमाणे उत्तरायणाचे दोन्ही अर्थ होऊ शकतील, परंतु ऋग्वेद १-७२-७ व १०.२-७. % बृहदारण्यक ६-२-१५. । प्रो. भानूंच्या मते " अमियोति " याच्या ठिकाणी " अग्निज्योति " असा पाठ असता तर बरे झाले असते. (श्रीमद्भगवद्गीता-उपसंहार-भगवगीतीतेचा अभ्यास, पान २३ पहा.)