या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालांनणय. शतपथब्राह्मणामध्ये देवांचे ऋतु व पितरांचे ऋतु सांगितले आहेत त्यांत " वसंतो ग्रीष्मो वर्षा । ते देवा ऋतवः । शरद्धेमंतः शिशिरस्ते पितरो" स यत्र उदगावर्तते देवेषु तर्हि भवति देवांस्तयभिगोपायति-अथ यत्र दक्षिणावर्तते पितृषु तर्हि भवति पितूंस्तयभिगोपायति" । असें मटले आहे. यावरून उत्तरायणाच्या अर्थाविषयी असलेत्या सर्व शंका नाहीशा होतील. जर वसंत, ग्रीष्म व वर्षा हे देव ऋतु आहेत व सूर्य जेव्हां उत्तरेकडे वळतो तेव्हां तो जर देवांमध्ये असतो, तर उघडच उत्तरायणाचा आरंभ वसंत संपातापासूनच झाला पाहिजे. मकरसंक्रमणापासून त्याचा आरंभ होतो हे ह्मणणे योग्य होणार नाहीं; कारण देवांचा पहिला ऋतु जो वसंत त्याला कोणत्याही ठिकाणी मकरसंक्रमापासून आरंभ होत नाही. यासाठी देवलोक, देवयान किंवा उत्तरायण याचा अर्थ वसंत संपातापासून शरत्संपातापर्यंत होणाऱ्या वसंत, ग्रीष्म, वर्षा, या ऋतूंच्या सहा महिन्यांचा काळ असाच घेतला पाहिजे. । ह्मणून याच्या उलट काही पुरावा जोपर्यंत मिळाला नाही, तोंपर्यंत प्राचीन वैदिककाळी वर्षारंभ सूर्य वसंत संपाती असतानां होत असे असें मानावयास मुळीच हरकत नाही. व ज्या अर्थी याच वेळी सूर्य उत्तर गोलार्धात जाई, त्या अर्थी त्याच्या उत्तरायणाचाही तेव्हांच आरंभ होत असे. ह्मणजे उत्तरायण, वसंत ऋतु, संवत्सर च यज्ञ या सर्वांचा आरंभ सूर्य वसंत संपाती असतांना होत असे. यानंतर सहा महिन्यांनी शरत्संपाती विषुव दिन येत असे शतपथ ब्राह्मण २-१-३.