या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. विभागाचा तो दर्शक झाला. परंतु एवढ्यानेच भागले नाही. वर्षारंभाबरोबर वार्षिक सत्रांचा आरंभही मकर संक्रमणी आला. व तैत्तिरीय संहितेमध्ये हा फरक पूर्ण झाल्याचे दिसून येते. व शतपथ ब्राह्मणांत जर उत्तरायणासंबंधी काही संबंध नसता तर त्याचा जुना अर्थ समजणे अशक्यच झाले असते. तरी या जुन्या पद्धतीचा अगदीच विसर पडला असें मात्र नाही. कारण नक्षत्र सत्रांसाठी वसंत संपातच आरंभ धरीत असत. हल्ली सुद्धां नर्मदेच्या दक्षिणेकडे रहाणारे आपण व्यावहारिक वर्ष वसंत* संपातापासून धरितों. तरी उत्तरायणामध्ये करावयास सांगितलेले सर्व धार्मिक विधि मकरसंक्रमणापासून आरंभ होणाऱ्या उत्तरायणांत करितों ह्मणून आतांसुद्धां आपण जर दुहेरी वर्षारंभ धरितो, तर प्राचीन आर्यांनी जुनी पद्धत टाकून देण्याच्या भीतीने दुहेरी पद्धत स्वीकारिली असल्यास त्यांत आश्चर्य करण्यासारखे काही नाही. - आतापर्यंत आपण असे पाहिले की प्राचीन आर्यलोकांचे वर्ष नाक्षत्र सौर होते, महिने चांद्र होते व ते वर्षारंभ वसंत संपातापासून धरीत असत. तसेंच जेव्हां हा वर्षारंभ बदलून मकर

  • खरे पाहिले असतां हल्ली वसंतसंपाती सूर्य येतो तेव्हां फाल्गुन महिना असतो. व आपल्या वर्षाला आरंभ चैत्रापासून होतो. पांचव्या शतकांत नक्षत्रांना अश्विनीपासून आरंभ करण्याचा जेव्हां प्रघात पडला, त्या वेळी वसंतऋतुस खरोखर चैत्रांत सुरुवात होऊन वर्षारंभही तेव्हांच होत असे. तेव्हां. पासन वसंत संपात जरी मागे हटला आहे, तरी वर्षारंभ चैत्रांत करण्याची पद्धति तशीच कायम राहिली आहे.