या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेद कालनिर्णय. संक्रमणापासून धरूं लागले, तेव्हां पूर्वीचा वर्षारंभ अजिबात न टाकतां त्याचा यज्ञकर्मात उपयोग करीत असत व इतर व्यवहाराला नवीन वर्षारंभ धरीत असत. आतां संपातचलनाच्या योगाने ऋतुचक्र जसे जसे मागे येऊ लागले तसे तसे वैदिक ऋषींनी आपल्या पंचांगामध्येही फेरफार केले होते की काय हे पहावयाचे आहे. हल्लींची आपली पंचागे, वसंत संपात रेवतीच्या चतुर्थ चरणी आहे असें धरून केलेली असतात; व जरी वसंतसंपात आतां रेवती पासून अठरा अंश मागें आला आहे, तरी सध्या आपण नक्षत्रमालेला आरंभ अश्विनी पासूनच करतो. रेवतीमध्ये वसंतसंपात शा. श. १९६ चे सुमारास होता, व तेव्हांपासून सध्यांची पद्धति सुरु झाली, असे मानून वसंतसंपाताची जागा नक्षत्रचक्रामध्ये बदलत गेल्याबद्दल काही पुरावा सांपडतो की काय हे आतां पहावयाचे. वर एके ठिकाणी सांगितलेच आहे की, वैदिक ऋषींचे आकाशसंबंधीं वेध नुसत्या डोळ्यांनीच घेतले असल्यामुळे त्यांमध्ये गणिताची फारशी भानगड नाहींच. आपणही तशाच प्रकारच्या साध्या पद्धतीचा स्वीकार केला पाहिजे. सूर्याच्या अगदी जवळ असलेल्या तारका नित्य पहाणे हेच ज्यांचे त्याची गति निश्चित करण्याचे साधन, त्या वैदिकऋषींनी क्रान्तिवृत्ताचे २७ भाग

  • काही सायनवादी लोक ही गोष्ट कबूल करीत नाहीत, अगदी प्राचीन काळी सुद्धा नक्षत्रे समविभागात्मक असून त्यांचा आरंभ वसंतसंपातापासून होता हणजे त्या संपातापासून १३०-२० इतक्या भागाला अश्विनी, त्यापुढे भरणी वगैरे नावे होती असे त्यांचे मत आहे. पण कै. शं. बा. दीक्षित यांनी हे हाणणे खोडून नक्षत्रे तेव्हां तारात्मक होती असे दाखविले आहे.