या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. गणिताप्रमाणे केले असतील हे संभवत नाही. हे २७ भाग ढोबळ प्रमाणावर मुख्य मुख्य तारांच्या खुणांवरूनच केले असले पाहिजेत. ह्मणून जेव्हां सूर्य अमक्या नक्षत्रीं होता अशा प्रकारचे उल्लेख वैदिक ग्रंथामध्ये आढळतील त्यावेळी त्यांचा अर्थ सूर्य त्या नांवाच्या तारकापुंजाजवळ होता असे समजावयाचे. आतां हे उघडच आहे की, असल्या स्थूल वेधांमध्ये दोन तीन अंशापर्यन्त एखादे वेळी चूक असेल. तरी ते वेदकालाइतक्या जुन्या कालाचा निर्णय करण्यामध्ये अगदी निरुपयोगी आहेत असे मात्र नाही. कारण सूर्याच्या क्रान्तिवृत्तांतील एखाद्या स्थितीमध्ये जरी पांच अंशांची चूक झाली तरी फक्त ३६० वर्षांचंच अंतर आपल्या हिशोबांत चुकेल. एवढे अंतर ज्या ठिकाणी हजारांनी काळ मोजावयाचा त्या ठिकाणी कांहींच नाही म्हटले तरी चालेल. असो. तर आपल्या पुढील विवेचनांत नक्षत्रे म्हणजे समविभागात्मक न समजता, त्या त्या नांवाचे नक्षत्रपुंज समजावयाचे. आता, जसा वसंतसंपातबिन्दु बदलत जाईल, तसे अयनान्तबिन्दूही बदलतील. व म्हणून जेव्हां वैदिक ग्रंथांमध्ये वसंतसंपाताच्या बदललेल्या स्थितीविषयी कांहीं उल्लेख आढळेल, तेव्हां त्याच्या अनुरोधाने होणा-या अयनातांच्या फरकाबद्दलही उल्लेख बाळले पाहिजेत.. व असे उल्लेख सांपडले म्हणजे आपल्या अनुमानांनां अधिक पुरावा मिळाल्यासारखे होईल. तर आतां वसंतसंपाताच्या स्थितीविषयी कोणते