या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२० वेदकालनिर्णय. धरून वेदागज्योतिषांतील अयनादिकांची स्थिति इ. स. पूर्वी १३०० वर्षांच्या सुमारास वर्तविली आहे. तैत्तिरीय संहिता, तैत्तिरीय ब्राह्मण व दुसरे कांहीं ग्रंथ यांत पुष्कळ ठिकाणी नक्षत्रचक्राचा आरंभ कृतिकांपासून केला आहे. तैत्तिरीयब्राह्मणामध्ये,* " कृत्तिकांमध्ये अग्न्याधान करावे, कारण कृत्तिका नक्षत्रांचे मुख होत" असे म्हटले आहे. याचा अर्थही कृत्तिकांपासून वर्षारंभ होत होता असा उघड दिसतो, कारण त्याच ब्राह्मणामध्ये " मुखं वा एददतूनां यद्वसंतः" ह्मणजे वसंत हा ऋतूंचे मुख आहे किंवा वसंत हा वर्षातील पहिला ऋतु आहे असे म्हटले आहे. अर्थात् या दोन्ही वाक्यांचा एकाच त-हेचा प्रयोग असल्यामुळे त्यांचा अर्थही एकाच पद्धतीने केला पाहिजे. याच तैत्तिरीयब्राह्मणामध्ये " नक्षत्रे ही देवांची मंदिरे आहेत. त्यांत देवनक्षत्रांमध्ये कृत्तिका पहिले व विशाखा शेवटचे व यम नक्षत्रांमध्ये अनुराधा पहिले व अपभरणी शेवटचे" असे म्हटले आहे. मागे एके ठिकाणी सांगितलेल्या शतपथब्राह्मणांतील वचनाच्या आधारावरून, या तैत्तिरयिब्राह्मणांतील वाक्याचा अर्थ लाविला पाहिजे; म्हणजे, त्यांत सांगितलेल्या दोन नक्षत्रविभागांचा देवयान व पितृयान यांशी संबंध आहे, ह्मणजे कृत्तिकांपासून विशाखांपर्यन्त देवनक्षत्रे, व त्यांत सूर्य आहे तोपर्यन्त देवयान

  • १-१-२-१ व १-१-२-६. + १५-२-७.