या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. किंवा उत्तरायण, आणि बाकीची यमाची किंवा पितृयानाची ऊर्फ दक्षिणायनाची नक्षत्रे, असे समजले पाहिजे. ही देवनक्षत्रे दक्षिणेकडे चालतात व यमनक्षत्रे उत्तरेकडे चालतात, म्हणजे सूर्य त्या नक्षत्रांमध्ये असतांना अनुक्रमें उत्तर व दक्षिण दिशांत असतो असें वर्तमानकाळाच्या रूपामध्ये त्यांचे वर्णन आहे व यासाठी तें वर्णन प्रत्यक्ष पाहून केलेले असावें असें सहज वाटते. या सर्व विवेचनावरून, तें जर बरोबर असेल तर, या वैदिक ग्रंथाच्या कालीं वसंतसंपाती कृत्तिकांमध्ये उदगयनारंभ होत असे हे अगदी उघड होते. - परंतु तैत्तिरीय" संहितेमध्ये याहूनही अधिक महत्वाचे असें स्थळ आहे. त्या ठिकाणी गवामयनासारख्या वार्षिक सत्राला आरंभ करण्यास उत्तम काळ कोणता या विषयी विवेचन केले आहे. त्याचा सारांश असा:-" संवत्सरासाठी दीक्षा वेणारांनी एकाष्टकेच्या दिवशी दीक्षा घ्यावी. एकाष्टका ही संवत्सराची पत्नी. म्हणून एकाष्टकेच्या दिवशी दीक्षा घेणारे संवत्सराच्या आरंभी दीक्षा घेतात. परंतु ते संवत्सराच्या पीडेप्रत दीक्षा घेतात. व त्यांचा शेवटच्या नांवाचा ऋतु होतो. व संवत्सरही व्यस्त होतो. ह्मणून फाल्गुनी पूर्ण मासी दीक्षा घ्यावी. कारण तें संवत्सराचे मुख आहे. व त्या दिवशी दीक्षा घेणारे संवत्सराच्या आरंभी दीक्षा घेतात. तरी

  • यानि देवनक्षत्राणि तानि दक्षिणेन परियन्ति । यानि यमनक्षत्राणि तान्युत्तरेण ।

७-४-८.