या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालीन र्गय. त्यांत एक दोष आहे तो हा की त्यांचा विषुवान् मेघयुक्त दिवशी येतो, ह्मणून चित्रापूर्णमासी दीक्षा घ्यावी. कारण तो संवत्सराचें मुख आहे. ह्मणून त्यादिवशी दीक्षा घेणारे संवत्सराच्या आरंभी दीक्षित होतात. यांत कोणताच दोष नाही. पूर्णिमेच्यापूर्वी चवथे दिवशी दीक्षा घ्यावी. कारण त्यायोगें एकाष्टकेला सोमक्रय साधतो. व ह्मणून ती निष्फल होत नाही. हे यजमान सत्र आटोपून उठले ह्मणजे त्यांच्या मागोमाग ओषधी व वनस्पति याही उठतात. " अशाच प्रकारचा मजकूर तांड्य ब्राह्मणामध्येही आला आहे. व तेथे शब्दही थोड्याशा फरकानें हेच आहेत. यांमध्ये एकाप्टका हा जो शब्द आहे त्याचा अर्थ सर्व मीमांसकांच्या मते माघांतील वद्यअष्टमी असा आहे. या दिवशी वार्षिक सत्रास आरंभ करावा असे प्रथम सांगितले. परंतु त्यास तीन नडी आहेत. पहिली अडचण ह्मणजे ही की, एकाष्टका ज्यावेळी आपण थंडीने अगदी त्रस्त होतो तेव्हां येते. दुसरी अडचण अशी की, या दिवशी दीक्षा घेतल्याने जरी वर्षारंभी दीक्षा घेतली असें होते, तरी ऋतूंसंबंधाने पाहिले असतां शेवटच्या ऋतूमध्ये दीक्षा घेतली असे होते. याच्यासंबंधानें तांड्य ब्राह्मणामध्ये आणखी असें झटले आहे की, " ते अवभृथस्थानाला जातात तेव्हां पाण्यापासून त्यांनां आनंद होत नाही" याचे कारण पाणी त्यावेळी फार थंड असते असे टीकाकार ह्मणतो. आतां एकाष्टकेला

  • ५-९. ॥ तस्य सानिर्या यदपोऽनभिनन्दन्तोऽन्यवयन्ति (५-९-३).