या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३ वेदकालनिर्णय. सत्रारंभ करावयास तिसरी अडचण अशी की, संवत्सर त्यावेळी व्यस्त ह्मणजे उलटा होतो. याचा अर्थ शबरादिकांनी दक्षिणायनान्तबिन्दूपासून सूर्य माघारा वळल्यामुळे अयन पालटते मला दिला आहे. आतां या अडचणी येऊ नयेत म्हणून फाल्गुनी पूर्णमासी दीक्षा व्यावी असे सांगितले. कारण असे केल्यानेही संवत्सरारंभी दीक्षा घेतल्यासारखे होते. परंतु त्यांतही एक असा दोष आहे की, विषूवान् पावसाळ्यांत येतो व तें कांहीं इष्ट नाही. यासाठी चित्रापूर्णमासी दीक्षा घ्यावी असे सुचविले. व त्यांत कांहीएक अडचण येत नाही असे सांगितले. ह्मणजे वर्षारंभी दीक्षा घेतल्यासारखे होऊनही वरच्यांपैकी काहीएक अडचण यांत येत नाही. ___पण याहूनही उत्तम दुसरी वेळ सांगितली. ती पूर्णमासाच्या पूर्वी चार दिवस ही होय. ही वेळ साधल्याने एकाष्टकेचाही उपयोग होतो; कारण त्या दिवशी सोमक्रय पडतो, असे म्हटले आहे. यावरून हा पूर्णमास एकाष्टकेच्या पूर्वीचा ह्मणजे मघापूर्ण मास असें जैमिन्यादि मीमांसकांनी ठरविले आहे. व त्याचा. इतर गोष्टींशीही मेळ पडतो. सोमाकराने लौगाक्षीचे " माघी पौर्णमासीच्या पूर्वी चार दिवस सांवत्सरिक सत्रासाठी दीक्षा घेतात " असे वचन एके ठिकाणी दिले आहे त्यावरून हीही पूर्णिमा माघीच असली पाहिजे असे दिसते. आतां वर दिलेलं मीमांसकांचे ह्मणणे जर बरोबर असेल तर त्यावरून आपल्या विषयाला प्रस्तुत अशी जी अनुमान निघतात ती ही:-तैत्तिरीयसंहिताकाळी उदगयनारंभ