या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. माघ कृष्ण अष्टमीच्या पूर्वी व बहुधा माघी पौर्णिमेलाच होत असे. कारण अष्टमीला अयन पालटलेले असे व पूर्णिमेच्या पूर्वी चार दिवस नसे. वर सांगितलेल्या तैत्तिरीयसंहितेतील उताऱ्यामध्ये सत्रारंभ वर्षारंभींच झाला पाहिजे असा कटाक्ष दिसतो. व ह्मणून माघी पौर्णिमा हा एक वर्षारंभ असला पाहिजे. हा वर्षारंभ अर्थात् उदगयनारंभापासूनच होत होता. परंतु एकाचकाळी एकएक महिन्याच्या अंतराने सारखे तीन वर्षारंभ असणे शक्य नाही. यासाठी फाल्गुनीपूर्णमास व चित्रापूर्णमास हे दोन जुने वर्षारंभ तैत्तिरीयसंहितेमध्ये सांगितले आहेत, आणि त्या काळी विषुवान् याचा खरा अर्थ माहीत नाहीसा झाला होता, असे उधड दिसते. अशा रीतीने वरील विवेचनावरून तैत्तिरीयसंहितेच्या काळी वसंतसंपात कृत्तिकांमध्ये होता असे दाखविण्यास सबळ आधार मिळतो. कारण उदगयनारंभ माघ पौर्णिमेला झाला ह्मणजे दक्षिणायनारंभ मघा नक्षत्रांत सूर्य असतांना झाला पाहिजे. ह्मणजे अर्थात् वसंतसंपात कृत्तिकांमध्ये आलाच. अशा रीतीने वेदांग ज्योतिषाच्या खेरीज तैत्तिरीयसंहिता व ब्राह्मण यांत आढळणाऱ्या चार निरनिराळ्या वचनांवरून वसंतसंपात कृत्तिकांमध्ये होता हे स्पष्ट दाखवितां आलें. एक, नक्षत्रचक्रास व तदधिष्ठित देवतांस कृत्तिकांपासून आरंभ केलेला आहे असे सांगणारे वचन. दुसरें कृत्तिका नक्षत्रांचे मुख आहेत असे स्पष्ट वचन. तिसरे कृत्तिका देवनक्षत्रांचा आरंभ आहे हे वचन; व चवथें माघ पौर्णिमेला उदगयनारंभ होत असे असे स्पष्ट सांगणारे सत्रारंभदिवसाविषयींचे विवेचन. या सर्व ठिकाणी