या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रस्तावना. - --- पुस्तक लिहिण्यास प्रेरणा करणारे कारण मुंबई फणसवाडी जगन्नाथाची चाळ येथे सात आठ वर्षे चालू असलेली बालवक्तमंडळ नांवाची संस्था होय. ही संस्था विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली आहे, आणि तिचा सभासद या नात्याने लिहिलेल्या विघयांपैकीच प्रस्तुत विषय हा एक आहे. लो. बाळ गंगाधर टिळक - यांनी सुमारे पंधरा वर्षांपूर्वी लिहिलेल्या The Orion or Researches into the Antiquities of the Vedas [ ओरायन ऊर्फ वेदांच्या प्राचीनत्वाविषयीं शोध ] नांवाच्या ग्रंथावरून सारांशरूपाने हे पुस्तक लिहिले आहे. मूळग्रंथ इंग्रजी भाषेत असल्यामुळे केवळ मराठी जाणणाऱ्या जिज्ञासूंनां त्यापासून काही कळावयाजोगें नाही. म्हणून निदान त्याचा सारांश तरी आपल्या मंडळां तील सभासदांस व त्यामुळे प्रसंगोपात् इतरही मराठी वाचकांस समजावा असा हे पुस्तक लिहिण्यांत मूळ हेतु होता. पण पुढे कित्येक मित्रांनी तें छापून काढावे अशी सूचना केली. त्यावरून मी तें छापून काढण्यास परवानगी देण्याविषयी मूळग्रंथकार लो० टिळक यांनां विनंति केली. त्यांनी ती मान्य करून ताबडतोब परवानगी दिली, आणि लिहिलेला मजकूर वाचून पाहून काही सूचना केल्या. त्याप्रमाणे व्यवस्था केल्यावर, ग्रंथसंपादक व प्रसाकर मंडळीचे व्यवस्थापक रा. रा. दामोदर सांवळाराम यंदे यांस