या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे वसंतसंपाताचा संबंध कृत्तिकांशी लाविलेला आहे. व ही गोष्ट सिद्ध करण्यास आणखी पुराव्याची गरज आहे असे वाटत नाही. _आतां कृत्तिका म्हणजे त्या नांवाचा तारकापुंज धरून तैत्तिरीयसंहिताकाळ इ. स. पूर्वी सुमारे २३५० वर्षे इतका येतो. परंतु काही युरोपियन पंडित या कृत्तिका नक्षत्रास विभागात्मक समजून हा काळ इ. स. पूर्वी १४२६ पर्यन्त आणतात. परंतु जे गृहस्थ वैदिक ऋषींनां अयनान्तबिन्दु संपातबिन्दु वगैरे गोष्टीचे सूक्ष्मज्ञान होणे शक्यच नव्हते असे म्हणतात, त्यानींच त्या ऋषींनां नक्षत्रे समविभागात्मक करावयास लावावें हे मोठे आश्चर्य आहे. असे म्हणणे युक्तीस अगदीच सोडून आहे. पण वैदिक काळाची मर्यादा याहूनही म्हणजे २३५० वर्षाहूनही फार दूर आहे असें सबळ पुराव्यानिशी सिद्ध केल्यावर असल्या कुशंकांस मुळीं थाराच मिळणार नाही.. बेंटलेने विशाखा म्हणजे दोन शाखांचे असा अर्थ करून व त्याचे कारण हे नांव पडण्याचे वेळी सांपातिक याम्योत्तरवृत्त विशाखांच्या दोन तान्यांमधून बरोबरं जात असे असें कल्पून, वसंतसंपाताला समविभागात्मक कृत्तिकांच्या आरंभी आणून ठेविले आहे. आतां तैत्तिरीयसंहिता व वेदांगज्योतिष यांच्या ___* दोन्ही ध्रुवांतून जाणारी जी दक्षिणोत्तर वर्तुळे त्यांप्स याम्योत्तर वृत्तें म्हणतात. अशी वृत्ते वाटतील तितकी कल्पितां येतील. त्यां पैकी दोन्ही संपातांतून जाणारे जे वृत्त त्यास सांपातिक याम्योत्तर वृत्त ह्मणावें.