या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६ वेदकालनिर्णय. उदगयनारंभामध्ये एका पंध्रवड्याचे अंतर आहे. व इतकें अंतर पडावयास वसंतसंपात १४ अंश तरी मागे आला पाहिजे. वेदांग ज्योतिषामध्ये तो संपात भरणीच्या दहाव्या अंशांत दिला आहे. व या ठिकाणापासून समभागात्मक कृत्तिका" फक्त ३ अंश २० कला आहे. अर्थात् बेंटलीचे म्हणणे निरर्थक होते. या कृत्तिका तारकात्मकच घेतल्या पाहिजेत. म्हणून तैत्तिरीयसंहिताकाळ बेंटले प्रभृतींच्या मताप्रमाणे इ. स. पूर्वी १४२६ न धरता २३९० हाच धरिला पाहिजे. वर सांगितलेल्या तैत्तिरीयसंहितेतील संवत्सरसत्राच्या अनुवाकामध्ये चित्रापूर्णमास व फल्गुनीपूर्णमास असे वर्षारंभ दिले आहेत. परंतु तैत्तिरीयसंहिताकाळी उद्गयनीं माघ महिन्यामध्ये वर्षारंभ होत असे हे वर दाखविलेंच आहे. आतां चित्रापूर्णमास व फल्गुनीपूर्णमास यांचा अर्थ वेबरच्या म्हणण्याप्रमाणे चैत्र व फाल्गुन महिने असा न घेता, त्या त्या महिन्यांतील पौर्णिमेचे दिवस असा घेतला पाहिजे. कारण एकाष्टकेच्या दिवशी दीक्षा घेतल्याने येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी हे दुसरे दिवस सांगितले आहेत. अर्थात् त्यांचा संबंध विवक्षित दिवसांकडे आहे, महिन्याकडे नाही. व हा अर्थ सायणासह सर्व मीमांसकांस संमत आहे. - एक समविभागात्मक नक्षत्र म्हणजे १३०-२०'. भरणीचे १०० झाल्यावर अर्थात् कृत्तिका ३०-२०' वर असणार. म्हणजे बेंटलेच्या ह्मणण्याप्रमाणे पहातां तैत्तिरीय संहिताकालापासून वेदांग ज्योतिष कालापर्यन्त संपात फक्त ३-२०' इतकाच मागे येतो. पण खरोखर तो निदान १४ तरा मागे आलेला आहे.