या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. चौदाव्या शतकांत वसंतारंभ आतांप्रमाणेच फाल्गुनांत होत असे. परंतु तेव्हां, तैत्तिरीयकालापेक्षां उदगयनारंभ एक महिन्याहूनही थोड़ा अधिक मागे हटला होता, या गोष्टीची बरोबर कल्पना न आल्यामुळे सायणाचार्यांनी परस्परविरुद्ध दिसणान्यावर सांगितलेल्या वर्षारंभांची, दुहेरी ऋतू कल्पून कशीतरी एकवाक्यता करण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु आतां संपातचलनामुळे वर्षारंभांत बदल होत जातो हे आपल्याला समजल्यावर सायणाचार्यांची युक्ती अयुक्त ह्मणून सोडून दिली पाहिजे. सुश्रुताच्या वैद्यक थामध्ये " फाल्गुनश्चैत्रौ वसंतः ” असें एके ठिकाणी मटले आहे. परंतु तो भाग त्यांत कोणी मागाहून घातलेला असावा असे दिसते. कारण त्याच्या जरा पूर्वी माघादि मासचक्र व शिशिरादि ऋतुचक्र सांगून, माघ फाल्गुन शिशिरऋतु, चैत्र वैशाख वसंतऋतु वगैरे सांगितले आहे. यावरून "फाल्गुनश्चैत्रौ वसंतः " वगैरे वर्णन ह कोणी तरी प्रक्षिप्त केले असले पाहिजे. सुश्रुत व चरक यांच्या ग्रंथाचे सार वर्णन करणाऱ्या वाग्भटाने " फाल्गुनश्चैत्रौ वसंतः " वगैरे वर्णनाचा काहीएक संबंध न आणितां त्याच्यापूर्वी सांगितलेली माघादि मासांची व शिशिरादि ऋतूंची पद्धत दिली आहे. यावरून " फाल्गुनश्चैत्रौ वसंतः " वगैरे वणर्न वाग्भटाच्यावेळी सुश्रुताच्या ग्रंथांत नव्हतेच, किंवा असले तरी त्यास तें सुश्रुताचें खास असावे असे वाटले नाही हे उघड आहे.

  • सूत्रस्थान अध्याय ६