या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय, असो. तर याप्रमाणे तैत्तिरीयसंहिताकाळी फाल्गुन हा वसंतमास होता असें ह्मणण्यास काही आधार नाही. यासाठी सायणाचार्याचा तसा अर्थ याठिकाणी तरी मान्य करता येत नाही. शिवाय हा अर्थ कित्येक ब्राह्मणे व सूत्रं यांत आलेल्या "फाल्गुनी* पौर्णिमा ही संवत्सराची प्रथम रात्र" अशा अर्थाच्या वचनांशीही विरुद्ध आहे. तैत्तिरीयब्राह्मणामध्ये उत्तरा फाल्गुनी ही संवत्सराची प्रथम रात्र, संवत्सराच्या आरंभी अग्न्याधान करणारा पुष्कळ संपत्तिमान होतो" असें मटले आहे. तसेंच सूत्रकारानीही " संवत्सरसत्रांचा आरंभ फाल्गुनी अथवा चैत्री पौर्णिमा या दिवशी करावा " जसें स्पष्ट सांगितले आहे. आता या सर्व वचनांचा जर काही अर्थ होत असेल तर फाल्गुनी पौर्णिमा ही वर्षाची पहिली रात्र असें खरोखर एकेकाळी मानीत असत हैं आपल्याला कबूल केल्याशिवाय गत्यंतर नाही. * आतां वर सांगितल्याप्रमाणे “ फाल्गुनी पौर्णिमा , संवत्सराचें मुख होय” या तैत्तिरीयसंहितेतील वाक्याचा सायणाचार्यानी दिलेला अर्थ तर ग्राह्य नाही. तर दुसरा अर्थ कोणता घ्यावयाचा? फाल्गुनी पौर्णिमेला वसंतसंपातीं वर्षारंभ होत असे अशी तर कल्पनाच करतां येत नाही. कारण या रीतीने वसंतसंपात उ.

  • एषा ह संवत्सरस्य प्रथमा रात्रिर्यत्फाल्गुनी -पौर्णमासी । श, ब्रा. ६-२, २. १८.. १-१. २. ८.

चार । आ० श्री. सू. १-२. १४. ३.