या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वेदकालनिर्णय. तराभाद्रपदांत येतो व अशी स्थिति येण्याला इ० स० पूर्वी* २०,००० वर्षेपर्यंत आपल्याला गेले पाहिजे. परंतु त्यांत कांहीं अर्थ नाही. उरला दुसरा मार्ग; ह्मणजे त्या पौर्णिमेला उदगयनी वर्षारंभ होत असे असे मानणे. माघी, फाल्गुनी, आणि चैत्री या पौर्णिमा - एकाच ठिकाणी व एकाच कारणासाठी सांगितल्या आहेत या गोष्टीवरून हाच अर्थ खरा असें साहजिक अनुमान होते. हा अर्थ अगदी स्वाभाविक व युक्तीला धरून दिसतो; व तैत्तिरीय संहितेच्या भास्करभट्ट नांवाच्या भाष्यकाराने हेच मत दिले आहे. त्याने सांगितल्याप्रमाणे फाल्गुनी पौर्णिमेच्या दिवशी एकदां केव्हां उदगयनी वर्षारंभ होत असला पाहिजे. या मताप्रमाणे वैदिक कालाची मर्यादा आणखी २००० वर्षे मागे जाते व ह्मणून यूरोपियन पंडित हे मत मान्य करावयास कांकू करतात. परंतु जी गोष्ट सबळ पुराव्यावरून सिद्ध होईल तिच्या योगाने कित्येक लोकांच्या पूर्वकल्पित कल्पनांशी जरी विरोध आला तरी आपणांस ती एवढ्याच कारणावरून कधीही टाकून देता कामा नये.

  • संपाताची पूर्ण प्रदक्षिणा होण्यास सुमारे २६००० वर्षे लागतात; परंतु क्रान्तिवृत्ताच्या उलट दिशेच्या एका गतिविशेषामुळे तो काल २१००० वर्षांचा होतो. हल्ली वसंतसंपात पूर्वाभाद्रपदांत आहे. परंतु " फाल्गुनी पौर्णिमा हे संवत्सराचे मुख होते" यावरून वसंतसंपात उत्तराभाद्रपदांत होता असे समजल्यास तेव्हांपासून आतापर्यंत संपाताची एक पूर्णप्रदक्षिणा होऊन वः दुसऱ्या प्रदक्षिणेला सुरुवात होऊन तो पुनः पूर्वाभाद्रपदांत आला असे मानावे लागते. व इतकी गोष्ट होण्याला समार २२००० वर्षे लागतील..